नांदगाव शहरात पुन्हा अतिवृष्टी, पूरसदृश परिस्थितीमुळे नांदगावकरांना धडकी

नांदगाव शहरात पुन्हा अतिवृष्टी, पूरसदृश परिस्थितीमुळे नांदगावकरांना धडकी

दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या नांदगांव तालुक्यात आज पुन्हा अतिवृष्टीसारखा पाऊस झाला. दुपारी दीड वाजेपासून सुरू झालेल्या या पावसामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले होते.

१३ दिवसांपूर्वीच लेंडी आणि शाकंभरी नदीला पूर आला होता. हा पूर ओसरत नाही तोच आज पुन्हा पुरसदृश परिस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे नांदगावकर धास्तावलेत. नागरिकांना जाण्यासाठी रेल्वेनं उभारलेल्या सब-वेत पुन्हा पाणी साचल्यानं रेल्वे नागरिकांनी रेल्वे ट्रॅकवरुन मार्ग काढला. लेंडी नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याच्या सूचना नांदगांव नगरपरिषदेनं दिल्यात. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नांदगाव प्रशासन सतर्क झालं असून परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवलं जातंय.

First Published on: September 21, 2021 6:12 PM
Exit mobile version