Food Poison : धुळ्यातील 200 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा; मेसचं जेवण केल्यानंतर झाला त्रास

Food Poison : धुळ्यातील 200 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा; मेसचं जेवण केल्यानंतर झाला त्रास

काही दिवसांपूर्वी भगर खाल्ल्याने 500 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात घडली. महाशिवरात्री दिवशी शिंगाड्याचे पीठ खाल्ल्याने नागपुरातील अनेकांना विषबाधा झाली. या घटना ताज्या असतानाच धुळ्यात 100 ते 150 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जवळपास 200 जणांना विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (food poison 200 trainees police in Dhule food poisoned after dinner)

नेमकं प्रकरण काय?

धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात सध्या 630 प्रशिक्षणार्थी पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे. गुरूवारी संध्याकाळी जवानांना मेसमधून जेवण देण्यात आले. हे जेवण केल्यानंतर मैदानात नियमित रोल कॉलसाठी हे पोलीस जवान हजर झाले. मात्र, जवानांचा रोल कॉल सुरू होताच अनेक जवानांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला. अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाल्याने एकच गोंधळ उडाला. त्यानंतर जास्त त्रास होत असल्याने जवानांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. त्यावेळी जवानांना विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, उपचारानंतर जवानांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान जवानांना मेसच्या जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती मिळताच धुळे शहरातील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती. या विषबाधा प्रकरणाची पोलिस अधीक्षक धुळे यांनी देखील पुष्टी केली आहे. ज्या जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातीत 8 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

शिंगाड्याचे पीठ खाल्ल्याने अनेक भाविकांना विषबाधा

महाशिवरात्रीनिमित्त बाजारांत अनेक प्रकारचे फराळाचे पदार्थ उपलब्ध करून देण्यात आले होते. नागपुरात अनेक भाविकांनी महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त शिंगाड्याचे पीठ खाल्ले. परंतु, हे पीठ खाल्ल्याने अनेक भाविकांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. नागपुरातील हिंगणा आणि कामठी या तालुक्यात विषबाधेच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.


हेही वाचा – Food Poisoning : महाशिवरात्रीला शिंगाड्याचे पीठ खाणाऱ्या भाविकांना विषबाधा, नागपुरात खळबळ

First Published on: March 15, 2024 9:17 AM
Exit mobile version