वनमंत्री संजय राठोड पोहरादेवीला रवाना, समर्थकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

वनमंत्री संजय राठोड पोहरादेवीला रवाना, समर्थकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

वनमंत्री संजय राठोड पोहरादेवीला रवाना

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वादात अडकलेले वनमंत्री व शिवसेना नेते संजय राठोड तब्बल १५ दिवसानंतर घराबाहेर पडले आहेत. मागील १५ दिवसांपासून वनमंत्री संजय राठोड बेपत्ता होते. पूजा चव्हाणने पुण्यातील राहत्या घराच्या इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली होती. पूजाच्या आत्महत्येत वनमंत्री संजय राठोड यांचा हस्तक्षेप असल्याचे म्हटले जात आहे. पूजाच्या आत्महत्येनंतर संजय राठोड बेपत्ता होते परंतु आता ते पोहरादेवीकडे रवाना झाले आहेत. मंत्री संजय राठोड यांनी सरकारी वाहनाचा वापर करणे टाळले आहे. खासगी वाहनासह संजय राठोड यांचा ताफा पोहरादेवीकडे रवाना झाले आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर काय बोलणार याकडे साऱ्या जनतेच्या लक्ष लागले आहे.

पोहरादेवी मंदिर परिसरात गर्दी होऊ नये यासाठी २०० पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोहरादेवी परिसरात बॉम्ब नाशक पथकाने काही वेळापूर्वी पाहणी केली होती. बंजारा समाजाने पोहरादेवी येथे मोठी जय्यत तयारी केली आहे. संजय राठोड पोहरादेवीत शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे म्हटले आहे. बंजारा समाज पोहरादेवीला ढोल ताशेसह संजय राठोड यांचे स्वागत करणार आहेत.


हेही वाचा : संजय राठोड पोहरादेवीला येणार, मंदिराच्या परिसरात फौजफाटा तैनात


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोहरादेवीत गर्दी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पोहरादेवी परिसरात ५० जणांची उपस्थितीची परवानगी प्रशासनाने दिली आहे. पोहरादेवी परिसरात सुरक्षेच्या कारणांमुळे प्रत्येक मार्गावर तपासणी केली जात आहे. प्रत्येक वाहनांची झाडाझडती केली जात आहे. वनमंत्री संजय राठोड यवतमाळच्या घरुन निघाले आहेत. १२ वाजताच्या सुमारास पोहरादेवीमध्ये दाखल होणार आहेत. वनमंत्री संजय राठोड १५ दिवसानंतर येत असल्यामुळे समर्थकांनी जय्यत तयारीही केली आहे.

वनमंत्री राठोड आपल्या पत्नीसह निघाले आहेत. मंत्री संजय राठोड काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पूजा चव्हाणने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली आहे. मंदिर परिसरामध्ये राठोड यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली आहे. लोकांनी वेगवेगळ्या वाटा काढत पोहरादेवीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

पोलिसांद्वारे वारंवार गर्दी न करण्याच्या सुचना दिल्या जात आहे. पोलिसांकडून गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संजय राठोड यांच्यासोबत निवडक कार्यकर्ते उपस्थित आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

First Published on: February 23, 2021 11:11 AM
Exit mobile version