पक्षाला माझ्या सदैव शुभेच्छा.., राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी खासदाराचा राजीनामा

पक्षाला माझ्या सदैव शुभेच्छा.., राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी खासदाराचा राजीनामा

संग्रहित छायाचित्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सगळ्यात जवळचे सहकारी माजी खासदार माजिद मेमन यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माजिद मेमन यांनी याबाबतच ट्वीट करून माहिती दिली आहे. वैयक्तिक कारणासाठी आपण पक्ष सोडत असल्याचं मेमन म्हणाले आहेत. मेमन यांनी ट्वीट करत पक्षाला माझ्या सदैव शुभेच्छा असं लिहिलं आहे.

माजिद मेमन यांचं ट्वीट काय?

16 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मला शरद पवारांकडून मार्गदर्शन आणि सन्मान मिळाला, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. वैयक्तिक कारणासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेसचं सदस्यत्व तात्काळ सोडत आहे. शरद पवार आणि पक्षाला माझ्या सुदैव शुभेच्छा आहेत, असं ट्वीट माजिद मेमन यांनी केलं आहे.

2019 मध्ये मेमन यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. मला वाटते की, पीएम मोदी हे अशिक्षित आणि रस्त्यावर फिरणाऱ्या माणसांसारखे बोलतात. एवढ्या मोठ्या पदावर ते बसले आहेत, त्यांचे पद हे घटनात्मक पद आहे, असं ते म्हणाले होते.

माजिद मेमन हे 2014 ते 2020 या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार होते. तसंच ते कायदा आणि न्याय समितीचे सदस्यही होते. पेशाने वकील असलेल्या माजिद मेमन यांनी राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्तेपद सांभाळले आहे.


हेही वाचा : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत प्रथमच बहिणीचा सहभाग, चर्चेला उधाण


 

First Published on: November 24, 2022 7:45 PM
Exit mobile version