माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन, नवापूर येथे उद्या होणार अंत्यसंस्कार

माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन, नवापूर येथे उद्या होणार अंत्यसंस्कार

नाशिक – माजी केंद्रीय मंत्री मानिकराव गावित यांचे निधन झाले. ते आठ वेळा खासदार म्हणून संसदेत निवडून आले होते. उद्या त्यांच्यावर नवापूर येथे उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित यांनी ट्विटरवरुन वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी दिली आहे.

मानिकराव गावित यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर नाशिकधील खासगी रुग्णाल्यात उपचार सुरू होते. आज सकाळी 8 च्या सुमारास त्यांच्या निधनाची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच राजकीय नेत्यांनी ट्वीट करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

माणिकराव गावित यांनी देशाचे माजी गृहराज्य मंत्रिपदही भूषवले होते. ते ८ वेळा नंदुरबार मतदारसंघात काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी दोन वेळा केंद्रात राज्यमंत्री आणि लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदही भूषवले होते. त्यांची मुलगी निर्मला गावित इगतपुरीच्या माजी आमदार तर मुलगा भरत गावित भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत.

माणिकरावांनी १९६५ मध्ये ग्रामपंचायतीपासून राजकारणाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री अशी पदे त्यांना मिळाली. संसदेतील सर्वात ज्येष्ठ खासदार म्हणून त्यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदही भूषवले होते. १९८१ मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा लढवली आणि विजयीही झाले. त्यानंतर त्यांनी सलग नऊ वर्ष विजयी टिळा मिळवला.

 राजकीय प्रवास –

त्यांचे शिक्षण जुन्या काळातील मॅट्रीक पर्यंत झाले होते. १९६५ साली ते नवापूर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले होते. ते नवापूर गटातुन धुळे जिल्हा परिषदेत सदस्य होते. १९७१ ते १९७८ साली धुळे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती म्हणून ते निवडून आले. त्यानंतर माणिकराव गावीत १९८० साली नवापूरचे आमदार झाले. प्रथमच १९८१ साली खासदार झाले, त्यावेळी त्यांचे 47 वय होते. तेव्हा पासुन ते आतापर्यंत तब्बल 9 वेळा लोकसभेवर प्रचंड म्हणजे लाखाच्या मताधिक्याने निवडून आले .

First Published on: September 17, 2022 10:46 AM
Exit mobile version