सरपंच पत्नीला पतीकडून जीवे मारण्याचा प्रयत्न

सरपंच पत्नीला पतीकडून जीवे मारण्याचा प्रयत्न

गहुंजे गावच्या सरपंच शीतल बोकडे यांना पतीने केली जीवे मारण्याचा प्रयत्न

गहुंजे गावच्या सरपंच शीतल किरण बोडके यांनी आपल्या पतीने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला,या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पती किरण बोडके हे पत्नीला वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन वडिलांकडून दोन कोटी रुपये घेऊन ये म्हणायचा. यातूनच त्यांचा वाद टोकाला गेला आणि आरोपी किरण बोडके यांनी पत्नी शीतल यांचा गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हिंजवडी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शीतल किरण बोडके (२८) या गहुंजे गावच्या सरपंच आहेत. तर आरोपी किरण बोडके हे त्यांचे पती आहेत. शीतल आणि किरण यांच्यात गेल्या अडीच वर्षांपासून वाद सुरू आहेत. किरण हा शीतल यांना मारहाण करत आहे. एवढेच नव्हे तर, शारिरीक आणि मानसिक छळ करत असल्याचे शीतल यांनी म्हटले आहेत. शीतल बोडके यांना त्यांचे पती माहेरातून २ कोटी घेऊन ये असे वारंवार सांगत होते. किरण याची बाहेरील महिलांशी अनैतिक संबंध आहेत. याचा जाब विचारल्यामुळे त्याने शीतल यांना मारहाण करु लागला, असे शीतलने पोलिसांना सांगितले आहे. शीतल आणि किरण यांच्यात गेल्या आठवड्यात वाद झाला होता. यावेळी तुला मारूनच टाकतो असे म्हणून आरोपी किरणने शितल यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी हिंजवडी पोलिसात पती विरोधात सरपंच शीतल बोडके यांनी तक्रार दिली आहे. स्थानिक पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

First Published on: June 25, 2019 2:29 PM
Exit mobile version