मटका किंग कृष्णा जाधवचा खून

मटका किंग कृष्णा जाधवचा खून

प्रातिनिधिक फोटो

बारामती परिसरात मटका किंग म्हणून प्रसिद्ध असलेला कृष्णा जाधव याचा दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास धारदार शस्त्राने सपासप वार करून खून करण्यात आला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.कायद्याने अवैध असणारा मटक्याचा व्यवसाय गेल्या ३५ वर्षपासून तो करत होता. राजकीय छत्रछायेखाली तो बारामती मध्ये मटका चालविणारा तसेच मटका किंग म्हणून ओळखला जात असल्याचा आरोप त्यावर होते.

कशी घडली घटना

जाधव याच्याकडे काम करणारा एक जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. जाधव हा त्याला भेटण्यासाठी हॉस्पिटल मध्ये गेला होता. हॉस्पिटल मधून बाहेर पडल्यावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार हत्याराने सपासप वार केले. त्यामध्ये रक्तभंबाळ झालेल्या जाधवचा मृत्यू झाला. जाधव चा खून झाल्याचे समजताच परिसरात खळबळ उडाली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. बारामतीचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे आणि त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.

First Published on: November 5, 2018 9:51 PM
Exit mobile version