नाशिकच्या सराफाला सोलापुरात १९ कोटींचा गंडा

नाशिकच्या सराफाला सोलापुरात १९ कोटींचा गंडा

नाशिक शहरातील सराफ व्यावसायिकाला त्यांच्या मित्राने तब्बल १९ कोटी ७८ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सराफ व्यावसायिक आपल्या पत्नीसमवेत जाब विचारला असता मित्राने त्यांनाच अश्लिल शिवीगाळ करत धमकावले. याप्रकरणी सराफ व्यावसायिकाने सोलापूरमधील विजापूरनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमोल सुरेश यादव (रा. युनिटी आयकॉन अपार्टमेंट, होटगी रोड, सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित यादव याने सराफ व्यावसायिकास मजरेवाडी-जुळे सोलापूर परिसरातील बॉम्बे पार्कजवळ भूखंड करारनामा करत त्या जागेवर निवसी संकुल बांधण्याचे आमिष देत प्लॉट विक्री करुन नफा मिळेल, असे आश्वासन देत सराफ व्यावसायिकाची फसवणूक केली. सराफ व्यावसायिकाने मित्रावर विश्वास दाखवत बांधकाम व्यवसायात गुंतवणूक करण्याचे ठरविले. मजेरवाडी परिसरातील दोघा जागा मालकांची जागा विकत घेतली होती. यासाठी नाशिक येथील सराफ व्यावसायिकाकडून २०१३ ते २०१९ या कालावधीत वेळोवेळी १९ कोटी ७८ लाखांची रक्कम घेतली होती. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संशयिताने सराफ व्यावसायिकाच्या बनावट स्वाक्षरीच्या आधारे कागदपत्र तयार करुन परस्पर फ्लॅट विक्री केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सराफ व्यावसायिकाने पत्नीसह सोलापुरात येऊन संशयित यादवला जाब विचारला. मात्र, संशयिताने त्यांनाच धमकावले. पत्नीला शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला.

First Published on: August 6, 2021 2:34 PM
Exit mobile version