पंढरपुर : दारू पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार

पंढरपुर : दारू पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार

दारू पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार

पंढरपुरमध्ये एका तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. पाच नराधमांनी एका १७ वर्षाच्या मुलीला दारु पाजून तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पंढरपूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, पाच आरोपींपैकी पीडित तरुणी एकाची मैत्रिण होती. त्यांने तिला एका अज्ञात स्थळी सुलभ शौचालयाजवळ बोलावले. त्यानंतर पाचही आरोपींकडून तिच्यावर बलात्कारासाठी दबाव टाकण्यात आला. यातील एका आरोपीने तिला छेडले तर दुसऱ्याने तिला जबरदस्ती दारू पाजली. त्यानंतर चौघांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. यात पाचव्या मुलाने सगळ्या प्रकरणाचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर अपलोड करू अशी धमकी देखील दिली.

भीतीमुळे तक्रार दाखल करण्यास घाबरत होती

बलात्काराचा व्हिडिओ शेअर होईल या भीतीमुळे पीडितीने ही घटना कोणालाही सांगितली नाही. याचाच फायदा घेत तरुणांनी तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. तिच्याकडे पैशांची मागणी देखील करण्यात आली. काही दिवसांनी पीडित तरुणीच्या घरी तिच्या वागण्यात फरक जाणवू लागला आणि त्यानंतर तिच्या आईने विचारले असता या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला असून पीडित तरुणीच्या घरच्यांकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी मनोज माने, साहिल सुधीर अभंगरा, अक्षय दिलीप कोळी, आरिफ शेख आणि माऊली तुकाराम अंकुशराव ही आरोपींची नावे असून यापैकी चार आरोपींना ताब्यात घेतले असून एकाचा शोध सुरू आहे.


हेही वाचा – नगरमध्ये तरुणीवर बलात्कार; सात आरोपी फरार


 

First Published on: August 17, 2019 12:38 PM
Exit mobile version