ठाणे हादरलं! मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, चौघेही ताब्यात

ठाणे हादरलं! मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, चौघेही ताब्यात

संग्रहित छायाचित्र

ठाण्यात सर्वांना हादरून सोडणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ठाण्यातील कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.

कल्याणमध्ये राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चौघांनी मिळून बलात्कार केल्याची घटना ठाण्यातील कल्याण या ठिकाणी घडली आहे. या घटनेत चार जणांना कोसळेवाडी पोलिसांनी अटक केली असून आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. त्यांच्याविरोधात आयपीसी कलम ३७६ (ड) आणि पोक्सो कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गुरुवारपासून बेपत्ता होती. मुलीचा शोध लागल्यानंतर तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार तिने पोलिसांना सांगितला. त्यानंतर कोसळेवाडी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. गुरुवारपासून बेपत्ता असलेली पीडित मुलगी पोलिसांना कल्याण रेल्वे स्थानकावर सापडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि मुख्य आरोपी यांच्यात फेसबूकवर मैत्री झाली. पीडिताशी चॅट करताना आरोपीने त्याचे प्रेयसीसोबत सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी तिली बोलवून घेतले आणि त्याच्या तीन मित्रांसह तिच्यावर बलात्कार केला.

दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चार तरुणांपैकी एक अल्पवयीन तरुणाचा समावेश आहे. तर आरोपी साहिल राजभर, सुजल गवळी आणि विजय बेरा अशी या आरोपींची नावं आहेत.

दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्येही एका सहाय्यक प्राध्यापकाने विद्यार्थिनीवर बलात्कार केला होता. त्यामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती. बामू विद्यापीठातील प्राध्यापकाने एका महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. वसतिगृहात राहणे सुरक्षित नसल्याचे सांगत एका विद्यार्थिनीला घरी पेइंग गेस्ट म्हणून राहण्यासाठी नेऊन तिच्यावर सहाय्यक प्राध्यापकाने बलात्कार केला होता. अशोक गुरप्पा बंडगर असं त्या आरोपी प्राध्यापकाचं नाव असून ते नाट्यशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आहे. या कृत्यात पती- पत्नीने संगनमताने मिळून माझ्यावर बेशुद्ध पडेपर्यंत अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप पीडित मुलीने मंगळवारी पोलिसांसमोर केला. मंगळवारी रात्री उशिरा बंडगर पती-पत्नीवर बलात्काराच गुन्हा दाखल करण्यात आला.


हेही वाचा : Chhatrapati Sambhaji Nagar Crime: सहाय्यक प्राध्यापकाने केला विद्यार्थिनीवर बलात्कार; शिक्षण क्षेत्रात


 

First Published on: April 28, 2023 12:36 PM
Exit mobile version