घरक्राइमChhatrapati Sambhaji Nagar Crime: सहाय्यक प्राध्यापकाने केला विद्यार्थिनीवर बलात्कार; शिक्षण क्षेत्रात खळबळ

Chhatrapati Sambhaji Nagar Crime: सहाय्यक प्राध्यापकाने केला विद्यार्थिनीवर बलात्कार; शिक्षण क्षेत्रात खळबळ

Subscribe

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील बामू विद्यापीठातील प्राध्यापकाने एका महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील बामू विद्यापीठातील प्राध्यापकाने एका महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. वसतिगृहात राहणे सुरक्षित नसल्याचे सांगत एका विद्यार्थिनीला घरी पेइंग गेस्ट म्हणून राहण्यासाठी नेऊन तिच्यावर सहाय्यक प्राध्यापकाने बलात्कार केला. अशोक गुरप्पा बंडगर असं त्या आरोपी प्राध्यापकाचं नाव असून ते नाट्यशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आहे. या कृत्यात पती- पत्नीने संगनमताने मिळून माझ्यावर बेशुद्ध पडेपर्यंत अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप पीडित मुलीने मंगळवारी पोलिसांसमोर केला. मंगळवारी रात्री उशिरा बंडगर पती-पत्नीवर बलात्काराच गुन्हा दाखल करण्यात आला. ( Chhatrapati Sambhaji Nagar Crime Assistant professor rapes student in the field of education )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय पीडिता बाहेरील जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर शहरात शिक्षणासाठी आली होती आणि तिने शहरातील एका महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. यादरम्यान एका सर्व्हिस कोर्सनिमित्त तिची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक अशोक गुरप्पा बंडगरसोबत ओळख झाली होती. तर विद्यापीठाबाहेरील महाविद्यालयाची विद्यार्थिनी असूनही बंडगरने मार्गदर्शन, सल्ला देण्याच्या बहाण्याने तिच्याशी जवळीक वाढवायला सुरुवात केली. या काळात त्याने मी तयार करत असलेल्या चित्रपटात तुलाही काम करण्याची संधी देतो, असे म्हणत आणखी जवळीक निर्माण केली. याचदरम्यान तिची विद्यापीठ परिसरात बंडगरची भेट झाली. हा प्रकार कळल्यावर त्याने तिला वडिलकीच्या नात्याने घरी चल सांगितले. त्याच्या पत्नीनेही होस्टेल सुरक्षित नसतात, तू आम्हाला मुलीसारखीच, तू आमच्याकडे पेईंन गेस्ट म्हणून राहा, असं सांगितलं.

- Advertisement -

( हेही वाचा: बंगालमध्ये अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी नागरिक संतप्त, पोलीस स्टेशन पेटवले )

विकृत प्रकार सुरु 

मुलीचा दर्जा देऊन घरी आणल्याने ती मोठ्या विश्वासाने त्यांच्यासोबत राहू लागली. परंतु काही दिवसांतच बंडगर हा तिच्याशी जवळीक वाढवू लागला. त्यानंतर त्याने घराचे सर्व आर्थिक व्यवहार तिच्या हातात दिले आणि चोरीचा आळ घेत तिच्यावर अत्याचार केला. असं तो वारंवार करत राहिला. हा सर्व प्रकार जेव्हा तिने बंडगरच्या पत्नीला सांगितला तेव्हा तिने आम्हाला मुलगा नाही तेव्हा तू माझ्या पतीशी लग्न कर आणि आम्हाला मुलगा दे असं सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -