आश्रमातील बालिकेस मिळाले इटलीतील आई-बाबा

आश्रमातील बालिकेस मिळाले इटलीतील आई-बाबा

आश्रमातील बालिकेस मिळाले इटलीतील आई-बाबा

अहमदनगर येथील स्नेहांकूर आश्रमामधील एका छोट्या चिमुकलीला चक्क इटलीतील आई – बाबा मिळाले आहे. त्यामुळे आता या चिमुरडीची चिंता मिटली आहे. ईटली येथील प्लाजो आणि ब्रुनो अशी यांची नावे असून त्यांनी त्या बालिकेला सांभाळण्याचा निर्णय घेतला आहे.

नेमके काय घडले?

२०१७ साली एक कुटुंब पहाटे एक दिवसाचे बाळ दिव्या (बदलले नाव) हिला घेऊन स्नेहांकुर या आश्रमाच्या गेट समोर आले. त्यांच्याकडे पाहून ते कोणत्यातरी संकटात आहे अशी शंका स्नेहांकुरच्या कार्यकर्त्यांना आली. ते कुटुंब भुकेने फार व्याकुळलेले होते. प्रथम त्यांची अवस्था पाहून कार्यकर्त्यांनी त्यांना जेवण दिले. बालिकेस स्नेहांकुर येथील कर्मचार्यांनी पाहिले असता तिला तात्काळ उपचाराची अवश्यकता आहे, असे आईस सांगितले. बाळाचे वजन अगदी कमी होते. बाल थंडीने कडकडले होते. काहीवेळाने स्नेहांकुर येथील कार्यकर्त्यांनी त्यांची चौकशी केली असता त्यांना हातात असलेल्या बाळाकडे पाहून डोळ्यात अश्रू आणून या बालिकेस आम्हाला कायमस्वरूपी द्यायचे आहे, असे सांगितले. चांगले आयुष्य मी तर बाळाला देवू शकत नाही परंतु तुम्हीच या बाळाचे आयुष्य चांगले करू शकाल. त्यानंतर बाल कल्याण समिती अहमदनगर यांच्या आदेशाने बालिका स्नेहांकुर मध्ये दाखल झाली.

दत्तक घेण्यास नकार दिला

दिव्या स्नेहांकुरमध्ये दाखल झाल्यावर तिला लगेचच रुग्णालयामध्ये दाखल करावे लागले. डॉक्टरांनी दिव्यावर उपचार सुरु केले. उपचार सुरु असताना तेथील डॉक्टरांनी स्नेहांकुर मधील कार्यकर्त्यांना मुलगी जर जगली तर मतीमंद अथवा तिला चालता येऊ शकणार नाही असे सांगितले. ज्या प्रकारे साधारण मुलांची वाढ होते. त्या प्रकारे दिव्याची वाढ होत नव्हती, म्हणून मागील दिड वर्षापासून दिव्यावर स्नेहांकुर येथील कर्मचारी तसेच नगरमधील आनंदऋषी रुग्णालयातील डॉ.वैभवी वंजारे यांनी मेहनत घेतली. तिला वेळोवेळी फिजियोथेरेपी देण्यात आली. आता या बालिकेची स्थिती उत्तम आहे. दरम्यानच्या काळात दिव्या या बालिकेस पाच दत्तक इच्छूक पालकांनी दत्तक घेण्यास नाकारले. अखेर ईटली येथील प्लाजो आणि ब्रुनो यांनी दिव्यास स्वीकारले. प्लाजो हे ईटलीतील नामांकित कंपनीत नोकरी करीत असून ब्रुनो या शिक्षिका आहेत. मागील ३ महिन्यापासून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आज या बालिकेस दत्तक विधानाद्वारे अहमदनगर मधील उद्योजक राहुल काळे आणि राहुल गांधी, केडगाव मधील नगरसेवक दिलीप सातपुते यांच्या हस्ते प्लाजो आणि ब्रुनो यांना दिव्या सुपूर्त करण्यात आली.


वाचा – पंजाब मधील निरंकारी बाबांच्या आश्रमावर बॉम्बहल्ला; ३ ठार, अनेक जखमी

वाचा – आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ५९ आश्रमशाळांना मान्यता

First Published on: November 21, 2018 5:13 PM
Exit mobile version