घरदेश-विदेशपंजाब मधील निरंकारी बाबांच्या आश्रमावर बॉम्बहल्ला; ३ ठार, अनेक जखमी

पंजाब मधील निरंकारी बाबांच्या आश्रमावर बॉम्बहल्ला; ३ ठार, अनेक जखमी

Subscribe

अमृतसर येथील राजासांसी गावात असलेल्या निरंकारी भवनावर सत्संगदरम्यान स्फोट झालेत. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला तर १२जण जखमी झाले आहेत. दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवरून या परिसरात बॉम्ब फेकले.

पंजाबच्या अमृतसर येथील निरंकारी बाबांच्या धार्मिक ठिकाणी स्फोट झाल्याची घटना आज घडली. स्फोट झाला त्यावेळी येथे सत्संग सुरू असल्याचे लोकांची गर्दी होती. या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला आहे तर १२ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी झालेल्या लोकांना स्थानिक नागरिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करत आहेत. दुपारी १२ च्या दरम्यान दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवरून या परिसरात बॉम्ब फेकले असल्याचे प्रत्यक्षदर्षींनी सांगितले आहे. या स्फोटानंतर पंजाब आणि दिल्लीतील काही भागांमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला.

 

- Advertisement -

SWAT पक्षकाची शोध मोहीम सुरू

रविवार असल्यामुळे निरंकारी भवनामध्ये सत्संगच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमादरम्यान दोन अज्ञान इसम दूचाकीवरून या परिसरात आले होते. त्यांनी आश्रमावर बॉम्ब फेकले आणि घटना स्थळावरून पोबारा केला. या स्फोटामुळे या परिसरात भितीचे वातावरण होते. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेनंतर पंजाबमध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली. यांनतर पोलिसांचे विशेष पथक SWAT नेही शोध मोहिम सुरू केली आहे. येथील असलेल्या लोकांनी सांगितलेल्या माहितीनुसार या दूचाकी स्वाराचा पाठलाग केला गेला मात्र हल्लेखोर पसार होण्यास यशस्वी ठरले.

- Advertisement -

जैश-ए-मोहम्मद या आतंकवादी संघटनेचे ६ ते ७ आतंकवादी दिल्लीत असल्याची माहिती पंजाब पोलिसांना मिळाली होती. यानंतर पंजाब पोलिसांनी हाय अलर्ट घोषीत केला होता. याबद्दल पंजाब पोलिसांच्या आयुक्तांना पत्र लिहीण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -