Goa Election 2022 : संजय राऊत -नाना पटोलेंची गोव्यात भेट, राऊतांकडून सूचक ट्विट

Goa Election 2022 : संजय राऊत -नाना पटोलेंची गोव्यात भेट, राऊतांकडून सूचक ट्विट

Goa Election 2022 : संजय राऊत -नाना पटोलेंची गोव्यात भेट, राऊतांकडून सूचक ट्विट

महाविकास आघाडी सरकारमधील नेते गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात दाखल झाले आहेत. गोव्यात महाराष्ट्रातील नेते एकमेकांच्या भेटी घेत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट केलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांची भेट गोव्यात भेट झाली आहे. गोव्यात काँग्रेसने एकला चलो रे चा नारा दिला आहे. परंतु काँग्रेस आणि शिवसेना यांच्या भेटीमुळे चर्चा सुरु झाल्या आहेत. शिवसेनेकडून काँग्रेसपुढे युतीचा पर्याय ठेवला होता परंतु काँग्रेसनं नाकारला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत शिवसेनेच्या प्रचारासाठी गोव्यात दाखल झाले आहेत. काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेसुद्धा गोव्यात दाखल झाले आहेत. संजय राऊत- नाना पटोले यांची शुक्रावारी भेट झाली. या भेटीचा फोटो संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला असून ‘हम’ असे सूचक ट्विट केलं आहे. राऊतांनी केलेल्या ट्विटमुळे गोव्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना आणि इतर घटक पक्षांनी आघाडी केली आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय़ घेतला असल्यामुळे गोव्यात महाविकास आघाडी करण्याचा महाराष्ट्रातील नेत्यांचा प्रयत्न फसला आहे. परंतु संजय राऊत यांनी हम अशा आशयाचे ट्विट केल्यामुळे याचा अर्थ नक्की काय आहे? अशी उलट सुलट चर्चा सुरु आहे. काँग्रेसला शिवसेनेचा पाठिंबा असेल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नाना पटोलेंची प्रतिक्रिया

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले की, केंद्र सरकार ज्या पद्धतीने सुडबूद्धीने राजकारण करत आहे. त्यावर उत्तर देण्यासाठी एक रणनिती तयार केली आहे. त्यानुसार केंद्राच्या सूडबुद्धीच्या राजकारणाला प्रत्युत्तर देणार असल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत.

संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊतांनी नाना पटोले यांच्याशी झालेल्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी राऊत म्हणाले की, नाना पटोले आणि अतुल लोंढे यांच्याशी भेट झाली. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत आम्ही चर्चा केली. या भेटीमुळे पक्षातील समीकरण आणखी घट्ट झाली आहेत. गोव्यात काँग्रेसची सत्ता येईल अशी शक्यता असल्याचे संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा : ST Workers Strike: 18 फेब्रुवारीपर्यंत विलीनीकरणाचा अहवाल सादर करा; हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

First Published on: February 11, 2022 3:29 PM
Exit mobile version