लग्नसराईदरम्यान सोन्याचे दर वाढले की घटले? जाणून घ्या, आठवड्याभराचा भाव

लग्नसराईदरम्यान सोन्याचे दर वाढले की घटले? जाणून घ्या, आठवड्याभराचा भाव

Gold Rate Today: सोन्याच्या तोळ्यामागे दर ५० हजारांच्या घरात, जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचा भाव

कोरोना परिस्थिती सुधारत असताना पुन्हा एकदा सोन्याला झळाली मिळाल्याचे दिसतेय. आज मुंबईत सोनं ५२ हजार प्रति तोळा तर याच सोन्याचा जळगावात ५१ हजार ७६३ प्रति तोळा असा भाव होता. यासह चांदी ६९ हजार ६०७ प्रति किलो आहे. दरम्यान आठवड्याभरात सोन्याचे दर थोड्या फरकाच्या किमतीने कमी-जास्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या आठवड्याच्या सुरूवातीला भारतात सोन्या-चांदीच्या दरात चांगलीच घसरण झाली होती.

दरम्यान, दिल्ली सराफ बाजारात सोन्याचे भाव ४६० रुपयांनी घसरले होते. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याची किंमत ४८ हजार ३७१ रुपयांवर पोहोचली होती. याआधी सोन्याचा दर प्रती १० ग्रॅम ४८ हजार ८३१ रुपयांपर्यंत घसरला होता. सोनेपाठोपाठ चांदीचाही दर घसरल्याचं पाहायला मिळालं. ६२९ हा दर रुपयांनी घसरला होता. त्यामुळे सराफ बाजारात चांदीचा दर ६२ हजार ४६९ प्रती किलो होता तर त्याआधी हा दर ६३ हजारांहून अधिक होता. महाराष्ट्रातील कमोडिटी बाजारात गुरुवारी सोने ५० हजारांच्या पार गेले होते, तर चांदीच्या किमतींनी ६७ हजार ५०० रुपयांचा टप्पा पार केला होता. गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याच्या किमतीत चढउतार होताना दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी वायदा बाजारात मार्च डिलीव्हरीची चांदी ७५९ रुपयांच्या वाढीसह प्रतिकिलो ६६ हजार ६७० रुपयांवर गेली होती. चांदीचा दर बुधवार अखेरीस ६५ हजार ९११ रुपये इतका होता. चांदीच्या किमतीत सलग तिसऱ्या दिवशी उसळी पाहायला मिळाली होती. वायदे बाजारात हा भाव ६७ हजार ५०० रुपयांच्या वर गेला होता.


LIC मध्ये नोकर भरती; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
First Published on: December 20, 2020 4:18 PM
Exit mobile version