चहाच्या वेळत मिळणार दारू

चहाच्या वेळत मिळणार दारू

प्रातिनिधिक फोटो

सकाळी सकाळी चहाच्या टपरीवर आपल्या गर्दी बघायला मिळते. सकाळी चहा घेऊन कामाची सुरूवात करणे हे मुंबईकरांचे वैशिष्ठ आहे. मात्र तळीरामांना सकाळ असो वा संध्याकाळ दारूची गरज लागले. चहा ऐवजी दारू मिळाली तरीही चालेल दिवस सुरु करणे हा तळीरामांचा उद्देश असतो. त्यामुळे दारूची दुकाने आता १० ऐवजी ८ वाजता उघडणार असल्यामुळे तळीरामांवर सरकारने कृपा केली असल्याची प्रतिक्रिया लोकांना दिली. ही अधिसूचना गृह विभागाने दिली आहे. मात्र ही दुकाने किती वाजता बंद होतील याबाबत अद्याप काहीच घोषणा केली गेली नाही. ग्रामीण भागात आतापर्यंत सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत दारूच्या दूकानांची वेळ होती. शहरी भागात सकाळी १० ते रात्री १२ वाजेपर्यंत या दुकानांचा वेळ होता.

वेळेत दारू मिळावी म्हणून घेतला निर्णय

शहरामध्ये दारू दुकाने उघडण्याची वेळ दोन तास अलीकडे करण्यात आला आहे. तळीरामांना वेळेत दारू मिळावी म्हणून वेळात बदल करण्यात आला आहे. बरेचदा मोलमजुरी करणारे लोक कामावर जाताना थोडी दारू पिऊन जातात. त्यांना कामावर पोहचण्यापूर्वी दारू मिळावी म्हणून दारूची दूकाने लवकरच उघडण्याचा निर्णय दिला गेला. वेळेपूर्वीच दूकाने उघडल्या जात असल्याचे आढळून आले आहे. असे प्रकार सर्रास होताना दिसल्यामुळे आता दुकांनाची वेळ अधिकृत करण्यात आली आहे.

First Published on: November 14, 2018 4:33 PM
Exit mobile version