जेलमध्ये टाकलं तरीही बैलगाडा शर्यत होणारच, गोपीचंद पडळकरांचे पोलिसांना आव्हान

जेलमध्ये टाकलं तरीही बैलगाडा शर्यत होणारच, गोपीचंद पडळकरांचे पोलिसांना आव्हान

राज्यात बैलगाडा शर्यतींचा ( bullock cart race) वाद चांगलाच पेटला आहे. बैलगाडा शर्यतीवरुन सांगलीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि पोलीस आमनेसामने आले आहेत. बैलगाडी शर्यतीला न्यायालयाकडून बंदी असताना सांगलीत पडळकर यांनी २० ऑगस्ट रोजी झरे येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले. याच दरम्यान पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये चांगलाच वाद रंगला. त्यानंतर पोलिसांकडून जिल्ह्याच्या सगळ्या सीमा बंद करण्याचे आदेश देण्यात आले. ‘जेलमध्ये टाकलं तरीही बैलगाडा शर्यत होणारचंट, असे म्हणत गोपिचंद पडळकरांनी पोलिसांना आव्हान केले आहेत. (Gopichand Padalkar challenge to police against bullock cart race)  पोलिसांची कारवाई सुरू असताना पडळकरांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पोलीस आणि पडळकरांमध्ये चांगलीच खडाजंगी पहायला मिळाली.

‘जेलमध्ये टाकलं तरीही बैलगाडा शर्यत होणारच. काय कारवाई व्हायची ती होऊ द्या. आम्ही बैलगाडा शर्यत भरवणारचं’,  असा आक्रमक पवित्रा पडळकरांनी घेत महाविकास आघाडी सरकार राष्ट्रवादीचे गृहमंत्रालय बळाचा वापर करत आहे. त्यांनी आमच्या शेतकऱ्यांचा ताबा घ्यायला सुरुवात केली आहे, अशी टीका देखील पडळकरांनी केली.

गोपिचंड पडळकरांनी सांगलीतील झरे गावात २० ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीत प्रथम येणाऱ्यास १ लाख ११ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. सांगलीत थे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्यानंतर झरे येथे बैलगाडा शर्यत होऊ नये यासाठी मंगळवारपासूनच आटपाटी तालुक्यात नाकाबंदी करण्यात आली होती. आम्ही गोवंश टिकवण्यासाठी शर्यतीचे आयोजन करत असल्याचे सांगत राज्यातील त्याचप्रमाणे परराज्यातून बैलगाडी चालक आणि मालक येतील असा दावा पडळकरांकडून करण्यात आलाय.

न्यायलयाकडून बैलगाडा शर्यतीला बंदी असताना कोणतीही शर्यत येथे होणार नाही,अशी भूमिका पोलीस अधीक्षक गेडाम यांनी घेतला आहे. त्यामुळे सांगलीत त्यांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आला असून बैलगाडी मालकांनी शर्यतीच्या ठिकाणी उपस्थित राहू नसे, असे आव्हान पोलिसांकडून करण्यात आले आहे.


हेही वाचा – मंदिरांपेक्षा जास्त गर्दी दारू दुकानांमध्ये, मग मंदिरे का बंद – फडणवीसांचा राज्य सरकारला सवाल

First Published on: August 17, 2021 7:13 PM
Exit mobile version