महाज्योती संस्थेचं विजय वडेट्टीवार यांनी वाटोळं केलं, गोपीचंद पडळकर यांचा आरोप

महाज्योती संस्थेचं विजय वडेट्टीवार यांनी वाटोळं केलं, गोपीचंद पडळकर यांचा आरोप

भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि महाज्योती संस्थेचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. महाज्योती संस्थेचं विजय वडेट्टीवार यांनी वाटोळं केलं असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. भाजप नेते गोपीचंद पडळकर महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. महाविकास आघाडीतील नेत्यांवर पडळकर सतत टीका करत असतात. वडेट्टीवार यांनी महाज्योती संस्थेबाबत केलेल्या घोषणांची उत्तर द्यावीत अन्यथा राजीनामा द्यावा अशी मागणीच गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. पडळकरांच्या टीकेला आता वडेट्टीवार काय उत्तर देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महाज्योती संस्थेवरुन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी घणाघात केला आहे. १० हजार विद्यार्थ्यांना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देऊ, यूपीएसीच्या विद्यार्थ्यांना खासगी संस्थेत प्रशिक्षण देऊ, उच्च शिक्षणासाठी ३१ हजाराची फेलोशिप देऊ, ओबीसींसाठी ७२ वसतीगृहे उभारी, अशा अनेक घोषणा वडेट्टीवार यांनी केल्या होत्या. महाज्योतीच्या स्वतंत्र कार्यालयासाठी ६० लाख रुपये देऊ इतकेच नाही तर गाजावाजा करुन महाज्योती संस्थेला १५५ कोटींचा निधी मंजूर करु मात्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे ३५ कोटीसुद्धा खर्च करण्यात आले नसल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

विकासाच्या मुख्यप्रवाहात नसणारा ओबीसी भटका विमुक्त समाज महाराष्ट्रात ५२ टक्के आहे. या समाजाला दुय्यम वागणूक देत प्रस्थापितांनी फक्त वापरण्याचं राजकारण केलं आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात वसंतराव नाईक यांनी भटके विमुक्त महामंडळ तर यांनी दाखवायलाही ठेवलं नव्हतं, समजासाठी काहीच केल नाही. यामुळे उपाय म्हणूण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाज्योती स्थापन केली आणि ३८० कोटी निधी मंजूर केला. परंतू महाविकास आघाडीमध्ये विजय वडेट्टीवार यांना अध्यक्ष बनवले आणि महाज्योती संस्थेचं वाटोळं केल. ओबीसी बांधवांसाठी घोषणा करुन नंतर तोंडाला पानं पुसायची, एवढा थापाड्या मंत्री इतिहासात झाला नसेल अशी खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

विजय वडेट्टीवार यांना ओबीसी, मदत आणि पुनर्वसन आणि चंद्रपुरचं पालकमंत्रीपद असे तीन-तीन पद भूषवूणही विजय वडेट्टीवार यांना महाज्योतीचं पद कशाला मिरवायचय? तसेच नागपूर पासून १५० किलोमीटर दूर असणाऱ्या गोंदीया जिल्ह्याला अधिकारी प्रदीप डांगेला महाज्योतीचा अतिरिक्त कार्यभार दिलाय का? आणि कशासाठी? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे.

First Published on: August 12, 2021 12:59 PM
Exit mobile version