गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्टार प्रचाराची यादी जाहीर, महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांवर सोपवली जबाबदारी

गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्टार प्रचाराची यादी जाहीर, महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांवर सोपवली जबाबदारी

गुजरात विधानसभा निवडणूक 2022 साठी काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेसने 40 स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. या स्टार प्रचारकांच्या यादीत काँग्रेस अध्यक्ष आणि गांधी कुटुंबातील प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील चार नेत्यांवरही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (gujarat election 2022 congress releases list of star campaigners sonia gandhi rahul gandhi mallikarjun kharge check here)

काँग्रेसच्या 40 प्रचारकांच्या यादीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग व कमलनाथ, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंग हुड्डा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील अशोक चव्हाण यांच्यासह माजी मंत्री शिवाजीराव मोघे, नसीम खान व रामकिशन ओझा यांचा या यादीत समावेश आहे.

182 सदस्यीय गुजरात विधानसभेसाठी येत्या 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर 8 डिसेंबरला मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली ज्यात रमेश चेन्नीथला, तारिक अन्वर, बी.के. हरिप्रसाद, मोहन प्रकाश, शक्तिसिंग गोहिल, डॉ. रघू शर्मा, जगदीश ठाकोर, सुखराम राठवा, सचिन पायलट, भरतसिंग सोलंकी, अर्जुन मोडवाडिया, सिद्धार्थ पटेल, अमित चावडा, नरेनभाई राठवा, जिग्नेश मेवानी, इम्रान प्रतापगढी, कन्हैय्या कुमार, कांतिलाल भुरिया, राजेश लिलोथिया, परेश धनानी, विरेंदरसिंग राठोड, उषा नायडू, बी.एम. संदीप, अनंत पटेल, अमरिंदरसिंग राजा व इंद्रविजयसिंग गोहिल यांचाही समावेश आहे.


गाझा पट्टीतील इमारतीमध्ये भीषण आग; 21 जणांचा होरपळून मृत्यू,अनेक जखमी

First Published on: November 18, 2022 10:45 AM
Exit mobile version