ST Strike : माझ्या आणि पतीच्या जीवाचं बरं वाईट झाल्यास शरद पवार, अजित पवार, वळसे पाटील जबाबदार – जयश्री पाटील

ST Strike : माझ्या आणि पतीच्या जीवाचं बरं वाईट झाल्यास शरद पवार, अजित पवार, वळसे पाटील जबाबदार – जयश्री पाटील

gunaratna sadavarte : माझ्या आणि पतीच्या जीवाचं काय वाईट झाल्यास शरद पवार, अजित पवार, वळसे पाटील जबाबदार - जयश्री पाटीलgunaratna sadavarte : माझ्या आणि पतीच्या जीवाचं काय वाईट झाल्यास शरद पवार, अजित पवार, वळसे पाटील जबाबदार - जयश्री पाटील

विलीनीकरणाच्या मागणीसाठी मागील साडे पाच महिन्यांपासून आझाद मैदानात एसटी कर्मचारी आंदोलन करत होते. मात्र शुक्रवारी रात्री अचानक या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी शरद पवारांच्या निवासस्थानावर दगड, चप्पल भिरवल्याचे दिसून आले. दरम्यान या घटनेमुळे राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने आझाद मैदानातील आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी पोलिसांनी हुसकावून लावले आहे. यादरम्यान मुंबईत गावदेवी पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. शरद पवार यांच्या घरावर दगडफेक करत आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना भडकवल्या प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. या अटकेनंतर आज वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत.

मला माझ्या पतीला भेटू देत नाहीत. त्यांना अतिरेकी असल्यासारखं घरातून घेऊन आले, कोणतीही माहिती न देता त्यांना अटक करणयात आली. हे शरद पवार यांचे षडयंत्र आहे. ते ताकदीचा चुकीता वापर करतायत. शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांनी दबाव आणण्यासाठी हे केल्याचा गंभीर आरोप जयश्री पाटील यांनी केला आहे.

इतकंच नाहीतर माझ्या पतीच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर त्यासाठी शरद पवार, दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार जबाबदार असतील, या तिघांकडून माझ्या पतीच्या जीवाला धोका असेही जयश्री पाटील यांनी म्हटले आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, पवार कुटुंबियांविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केल्याने आमच्यावर दबाव टाकण्यासाठी कारवाई केली. मुघलाईसारखं कायद्याचा वापर सुरु आहे. पण शरद पवारांची ही दहशत चालणार नाही. तुम्ही संविधानापेक्षा मोठे नाही, हे मी आधीच सांगितले होते, अनिल देशमुखांवर कारवाई झाली तशीच पवारांवर होईल असं जयश्री पाटील म्हणाल्या.


ST Workers Strike : आधी जल्लोष, मग नंतर आंदोलन का? आंदोलकांना कुणीतरी भडकवतयं- अजित पवार

First Published on: April 9, 2022 10:18 AM
Exit mobile version