नो क्वेशन आन्सर, लाज वाटायली का?, गुणरत्न सदावर्तेंनी केली संजय राऊतांची नक्कल

नो क्वेशन आन्सर, लाज वाटायली का?, गुणरत्न सदावर्तेंनी केली संजय राऊतांची नक्कल

नो क्वेशन आन्सर लाज वाटायली का?, गुणरत्न सदावर्तेंनी केली संजय राऊतांची नक्कल

एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या ३ महिन्यांपासून एसटीचे शासकीय सेवेत विलीनीकरण करण्यात यावी या मागणीसाठी संप पुकारला आहे. विलीनीकरणाच्या मुद्यावर हायकोर्टात सुनावणी झाली असून पुढील सुनावणी आता २५ फेब्रुवारी शुक्रवारी होणार आहे. या हायकोर्टाच्या निर्णयावरुन एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची नक्कल करुन दाखवली आहे. नो क्वेशन आन्सर, नो क्वेशन आन्सर असे म्हणत संजय राऊत थोडे आऊट ऑफ फोकस झालेत की काय? असे वाटत असल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर हायकोर्टात सुनावणी करताना पुढील सुनावणी शुक्रावार २५ फेब्रुवारीला होणार असल्याचे कोर्टाकडून निर्णय देण्यात आला. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांचीच नक्कल सदावर्ते यांनी केली आहे. खासदार संजय राऊत यांनी मागील आठवड्यात वादळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत भाजप नेत्यायंवर आरोप केल्यानंतर संजय राऊतांनी नो क्वेशन आन्सर असे म्हणत पत्रकार परिषद संपवली. यावरच सदावर्ते यांनी टीका केली आहे.

वकील गुणरत्न सदावर्ते यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते नो क्वेशन आन्सर, नो क्वेशन आन्सर असे म्हटलं आहे. तसेच त्यांच्या बाजूला वकील जयश्री पाटील यांच्या कानात ते नो कमेंटस, नो कमेंटस असं जोरात ओरडत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची भेट झाली. यावेली पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत केसीआर यांच्या कानात नो कमेंट्स असे म्हणताना दिसले. यावरु सदावर्तेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

मी मुन्नाभाई एम.बी.बी.एस या पिक्चरमध्ये पाहिला होता आता राजकारणातील संजुबाबासुद्धा पाहिला आहे. या संजुबाबाला तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना विचारण्यास काय झाले पाहिजे. सरकारच्या संवेदना शून्य झाल्या आहेत. हिंदुस्थानी कष्टकरी आपल्या संविधानाच्या जोरावर जिंकणार आहेत असे सदावर्ते यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : Video : रस्त्यावर हत्तीला पाहून बाईक स्वार थांबले, मात्र पुढे जे घडलं त्यामुळे झाली पळता भुई थोडी

First Published on: February 22, 2022 7:36 PM
Exit mobile version