घरताज्या घडामोडीVideo : रस्त्यावर हत्तीला पाहून बाईक स्वार थांबले, मात्र पुढे जे घडलं...

Video : रस्त्यावर हत्तीला पाहून बाईक स्वार थांबले, मात्र पुढे जे घडलं त्यामुळे झाली पळता भुई थोडी

Subscribe

हाथी मेरे साथी हे हिंदी सिनेमा किंवा असे वाक्य तुम्ही एकलेच असेल. मात्र सोशल मीडियावर हत्ती आणि दोन तरुण समोरा समोर आल्याचा एक व्हिडीओ चांगलाच धूमाकूळ घालत आहे. एका हत्तीने अचानक बाईक स्वार तरुणांवर हल्ला करण्यासाठी धावून आला असं दृष्य या व्हिडीओमध्ये दिसत आहे. बाईक स्वार तरुण आपला जीव वाचवण्यासाठी बाईक तिथेच सोडून पळून जातात. हा व्हिडीओ कधी शूट करण्यात आला याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. परंतु व्हिडीओ पाहून हाथी मेरे साथी असे म्हणाऱ्यांच्या काळजाचा ठोका वाढला असेल.

रस्त्यावर हत्ती तरुणांचा पाठलाग करतो हा व्हिडीओ अवघ्या 13 सेकंदाचा आहे. यामध्ये पाहू शकता की एक हत्ती रस्त्यावरुन जात असतो यावेळी एका बाईकवर स्वार असलेले दोन तरुण रस्त्याच्या बाजूला उभे राहतात. जंगलातून जाणाऱ्या रस्त्याने हे दोन्ही बाईकस्वार चालले होते. हत्ती मध्येच उभा असल्यामुळे ते मोटार सायकलचा वेग कमी करुन बाजूला उभे राहतात. परंतु अचानक हत्ती त्यांच्या दिशेने येत असल्याचे पाहून तरुणांनी पळण्याचा प्रयत्न केला. बाईकवर मागे बसलेला तरुण लगेच पळून जातो. हत्ती त्यांच्या दिशेने पळायला लागल्यावर दुसरा तरुणसुद्धा बाईक जागेवरच सोडून पळ काढतो. शेवटी हत्ती बाईकजवळ येऊन थांबतो आणि पुन्हा आपल्या मार्गाने जातो. दरम्यान हा व्हिडीओ मजेशीर असला तरी हत्ती चांगलाच आक्रमक झाला असल्याचे यावरुन दिसतं आहे.

- Advertisement -

हत्ती दुचाकीस्वारांचा पाठलाग करतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 7 हजार यूजर्सने लाईक केले आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी यावर आपली प्रतिक्रियासुद्धा दिली आहे. हा एक हल्लाच होता असे एका युजरने लिहिले आहे. तर दुसरा युजरने हत्तीकडून लिहिले की, हॅलो दोस्तो कहा भाग रहे हो, तुमने कहा था कि मेरे लिए मूंगफलियां लेकर आओगे? दर्यान हा व्हिडीओ नेटकरी चांगलेच लाईक करत आहेत.

- Advertisement -


हेही वाचा : युद्धाचे ढग! रशियन सैन्य युक्रेनमध्ये घुसले; आता अमेरिका, पाश्चात्य देशांची भूमिका काय?

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -