एसटी कर्मचाऱ्यांच्या पैशातून सदावर्ते मालामाल, जमवली कोट्यवधींची संपत्ती

एसटी कर्मचाऱ्यांच्या पैशातून सदावर्ते मालामाल, जमवली कोट्यवधींची संपत्ती

एसटी कर्मचाऱ्यांच्या पैशातून सदवरते मालामालं,जमवली कोट्यवधीची संपत्ती

राज्यात गेल्या ५ महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. एसटीचे शासकीय सेवेत विलीनीकरण करण्यात यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांची होती. या मागणीला पाठिंबा देत वकील गुणरत्न सदावर्ते न्यायालयात राज्य सरकारविरोधात लढत होते. या काळात सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ५५० रुपये घेतले अशाप्रकारे २ कोटीपेक्षा जास्त रक्कम गोळा करण्यात आली आहे. सदावर्ते यांनी या पैशातून मालमत्ता खरेदी केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्यावर कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पैशातून कोणती आणि कुठे कुठे मालमत्ता खरेदी केली आहे. याचा शोध सुरु आहे. सदावर्ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. कर्मचाऱ्यांना चिथावणी दिल्यामुळे आणि त्यांच्याकडून पैसे गोळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. सदावर्तेंनी कर्मचाऱ्यांच्या पैशातून मालमत्ता खरेदी केली असा आरोप सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात दिली आहे. सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील ८० लाख रुपये घेऊन फरार झाल्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जयश्री पाटील यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदावर्तेंच्या घरात सापडले पैसे मोजण्याचे मशीन

मुंबई पोलिसांनी सदावर्ते यांना अटक करुन चार दिवस चौकशी केली. यानंतर सदावर्तेंना सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यानंतर आता कोल्हापूरच्या पोलिसांनी सदावर्तेंचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. कर्मचाऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप सदावर्ते यांच्यावर आहे. यादरम्यान त्यांच्या घरी आता पैसे मोजण्याचे मशीन सापडल्यामुळे खळबळ माजली आहे.

सदावर्तेंनी मुंबईत खरेदी केली मालमत्ता

सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करुन मालमत्ता खरेदी केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परळमध्ये ६० लाख रुपयांची जागा खरेदी केली आहे. भायखळामध्ये मालमत्ता खरेदी करण्यात आली आहे. तसेच एक चारचाकी गाडी खरेदी केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


हेही वाचा : हे सरकार जून महिन्याच्या अगोदर जाणार, नारायण राणेंची नवी भविष्यवाणी

First Published on: April 19, 2022 6:55 PM
Exit mobile version