संपूर्ण देशात १६ जूनपासून हॉलमार्किंग अनिवार्य, सराफांची लहान मोठी दुकाने बंद होण्याची शक्यता

संपूर्ण देशात १६ जूनपासून हॉलमार्किंग अनिवार्य, सराफांची लहान मोठी दुकाने बंद होण्याची शक्यता

Gold Rate: आज सोनं झालं स्वस्त! वाचा काय आहेत आजचे दर

केंद्र सरकारने दागिन्यांबाबतील एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दागिन्यांसाठी संपूर्ण देशात १६ जूनपासून हॉलमार्किंग अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी घेतला आहे. हॉलमार्किंग अनिवार्य केल्याने सराफांची लहान मोठी दुकाने बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हॉलमार्कशिवाय सराफांना दागिने विकता येणार नाहीत. असे केल्यास सराफांना दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. हॉलमार्क अनिवार्य केल्याने आता ग्राहकांना २४ कॅरेटचे सोन्याचे दागिने मिळाणार नाहीत. १४, १८ आणि २२ कॅरेटचे सोन्याचे दागिने घ्यावे लागतील. याआधी १ मेपासून भारतात दागिन्यांवर हॉलमार्क लागू करण्यात येणार होते. (Hallmarking is mandatory in india from June 16, small and large bullion shops are likely to close)

जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशनचे पुणे आणि नागपूर पदाधिकाऱ्यांनी मुंबई व नागपूर हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणीसाठी कोर्टाने १५ जूनपर्यंत BIS सराफांवर कारवाई न करण्याचे आदेश दिले होते. त्याचप्रमाणे पीयूष गोयल यांच्याकडे लॉकडाऊनमुळे सराफांची दुकाने बंद असल्याने हॉलमार्किंग अनिवार्य करण्याची प्रोसेस पुढे ढकलण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रावसाहेब दानवे यांनी केली होती. त्याप्रमाणे देशातील दहा मोठ्या असोसिएशनच्या २० पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. पीयूष गोयल यांनी या चर्चेत १६जून पासून हॉलमार्किंग अनिवार्य करण्याचा निर्णय सांगितला. त्यासंबंधी काही तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी एक समिती बनवली आहे. ही समिती चार दिवसात अहवाल देणार आहे.

राज्यातील सराफ व्यापारांना विश्वासात न घेता केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे राजेश रोकडे यांनी म्हटले आहे. देशातील अनेक राज्यात आणि जिल्ह्यात हॉलमार्किंग सेंटर नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी हॉलमार्किंग अनिवार्य करु नका अशी मागणी देखील राजेश रोकडे यांनी केली. प्रत्येक जिल्ह्याच्या सराफी व्यापारांच्या संख्येनुसार, तिथे एक किंवा दोन हॉलमार्किंग लॅब असायला हवेत असे ते म्हणाले.


हेही वाचा – ICAI CA Exams 2021: ५ जुलैपासून सीएच्या इंटर्मिडीएट आणि फायनल परीक्षा होणार सुरु

 

 

 

First Published on: May 26, 2021 10:00 PM
Exit mobile version