Kirit Somaiya VS Hasan Mushrif: खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटील, सोमय्यांचा फक्त वापर, हसन मुश्रीफांचा पलटवार

Kirit Somaiya VS Hasan Mushrif: खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटील, सोमय्यांचा फक्त वापर, हसन मुश्रीफांचा पलटवार

Kirt Somaiya : हसन मुश्रीफांचा तिसरा घोटाळा, जावयासोबत १५०० कोटींचा घोटाळा केल्याचा सोमय्यांचा आरोप

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री यांच्याविरोधातील दुसरा १०० कोटी रुपयांचा घोटाळा उघड केला आहे. मुश्रीफ यांनी यापुर्वी १२७ कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे. सोमय्यांच्या आरोपावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. किरीट सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे असून फक्त टूल म्हणून भाजपने सोमय्यांचा वापर केला आहे. सोमय्या फक्त यामध्ये प्यादं आहेत खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटील असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. खोटे आरोप करुन बदनामी केली असल्यामुळे १०० कोटी फौजदारी अब्रुनुकसानीचा दावा तयार होत आहे. परंतु अजून ५० कोटींचा दावा करणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. भाजप कोल्हापूरमधून भुईसपाट झाल्यामुळे माझ्यावर आरोप करण्यात येत असल्याचा दावा हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

सोमय्यांच्या आरोपावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे की, किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांमागे भाजपचे षडयंत्र आहे. चंद्रकांत पाटील यामागील मास्टरमाईंड आहेत. अनेकदा राज्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यावर, पक्षावर, महाविकास आघाडी सरकारवर आणि नंतर अनिल देशमुखांच्याबाबत केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरकारवाईवर आवाज उठवले आहेत. भाजपचे नेते मला कसं थांबवता येईल याचा प्रयत्न करत होते. यासाठी सोमय्यांचा वापर केला आहे. त्या जिल्ह्यामध्ये भाजप भुईसपाट झाला आहे. त्यामागे हसन मुश्रीफ कारणीभूत आहे. त्यामुळे त्याला थांबवण्यासाठी हसन मुश्रीफवर कारवाई करण्यात येत असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

मैत्रीमुळे चंद्रकांत पाटलांची बदली रद्द

भाजप आज कोल्हापूर जिल्ह्यात ते शून्य आहेत. जिल्हापरिषद, नगरपालिकात, जिल्हा मध्यवर्ती बँक ताब्यात नाही. मार्केट कमिटी ताब्यात नाही. यामुळे सातत्याने दिल्लीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करणार होते. परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मैत्रीमुळे ते वाचले आहेत. कोल्हापूरमध्ये होणारा सुपडा साफ हा त्यांचे अपयशाचे कारण आहे. यामुळे हसन मुश्रीफवर आरोप करण्यात येत आहेत असे मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटलांनी पुरुषार्थाप्रमाणे वागावे

हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांवर घणाघात केला आहे. सोमय्या कागद काढतात आणि फडणवीस यांच्याकडे घेऊन जातात. फडणवीस सांगतात त्यांच्यावर कारवाई केली जाते. राजकीय कारणामुळे फडणवीसांनी माझ्यावर कारवाई करण्यास सांगितले असेल असे हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थ प्रमाणे वागावे, असे आरोप करुन, कोणाचातरी वापर करुन बदनामी करुन काहीही मिळणार नाही. सगळे आरोप खोटे आहेत बिनबुडाचे आहेत. त्यामुळे निषेध करुन १०० कोटी रुपयांचा फौजदारी अब्रुनुकसानीचा दावा तयार केला आहे.

सोमय्यांचा आरोप बिनबुडाचा

सोमय्यांनी केलेला आजचा आरोप बिनबुडाचा आणि खोटा आहे. सोमय्यांची सीएची पदवी खोटी आहे का काय? असं वाटत आहे. आजचा आरोप खोटा असून त्यांनी अजूनही अभ्यास करावा, त्यांच्याकडे सीए पाठवतो आणि मग त्यांना समजेल की हसन मुश्रीफ कसा माणूस आहे.

सोमय्यांनी आरोप केल्यात्याबदद्ल माझी मापी मागावी, नलावडे कारखान्यावरुन आरोप केला आहे. त्यात ब्रीक्स इंडिया कंपनीसोबत माझ्या जावयाचा काहीही माहिती नाही आहे. त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. ब्रीक्स इंडिया कंपनी ४४ लाख शेअर कॅपिटलची आहे. एसयू ही शेअर कंपनी नाही ती महाराष्ट्राची कंपनी आहे. ती सुद्धा १ लाख रुपये शेअर कॅपिटलची आहे. मग १०० कोटींचा घोटाळा होईल कसा ?

कोल्हापूर मध्यवर्ती जिल्हा बँकेने निविदा काढली नाही. बँकेचे या कारखान्याला कर्ज नव्हते, शासनाने २०१२-१३ साली हा कारखाना चालवायला दिला होता. १० वर्षांच्या करारानुसार हा कारखाना दिला होता. ही कंपनी २०२० ला दिली असल्याचे सांगितले. २०२० ला ही कंपनी सोडली होती. १० वर्षांसाठी ४३ कोटींना घेतला होता. २ वर्षांपासून तोट्यात असल्यामुळे या कंपनीने कारखाना सोडला होता. यामुळे सोमय्यांनी अजून अभ्यास करावा, कारखाना सोडल्याची ऑर्डर आहे. महाराष्ट्राच्या शासनाच्या परवानगीने हा कारखाना २०१२ मध्ये १० वर्षांच्या सह्योगी तत्वावर घेतला होता. २ वर्षांपुर्वी फार मोठा तोटा येत होता यामुळे कारखाना सोडून संचालक मंडळाच्या ताब्यात दिला आहे. यासाठी १०० कोटींचा पहिला आणि आता ५० कोटींचा दुसरा असा १५० कोटींचा दावा दाखल करावा लागणार असल्याचे सोमय्यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा :  हसन मुश्रीफांचा दुसरा १०० कोटींचा घोटाळा किरीट सोमय्यांनी केला उघड


 

First Published on: September 20, 2021 11:45 AM
Exit mobile version