…म्हणून 15 आणि 16 ऑक्टोबरला होणारी आरोग्य विभागाची परीक्षा रद्द

…म्हणून 15 आणि 16 ऑक्टोबरला होणारी आरोग्य विभागाची परीक्षा रद्द

मुंबई – राज्यातील ग्रामविकास विभागाच्या गट क अंतर्गत येणाऱ्या आरोग्य वभागाची 15 आणि 16 आक्टोबरला होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून परीक्षेसंबंधीत नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असल्याचे समजते आहे.

आरोग्य विभागाची ही परीक्षा प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा दुय्यम निवड मंडळामार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या आधी 15 आणि 16 ऑक्टोबरला या परीक्षा घेतल्या जाणार होत्या. 17 ते 31 ऑक्टोबर दरम्यान परीक्षेचा निकाल जाहीर करून यासाठीच्या पात्र उमेदवारांची यादी सुद्धा जारी करण्यात येणार होती.

आरोग्य सेवक भरतीची ही परीक्षा मार्च 2019 पासून  रखडलेली असून या आधी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधित भरतीचे विस्तृत वेळापत्रक आणि त्याबद्दलचा शासन निर्णय जाही करण्यात आला होता. मार्च 2019च्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील आरोग्य विभागाशी संबंधि गट क पदाच्या भरती बाबतशासन निर्णय जारी करण्यात आला होता.

गट क मध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी ही भरती केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आरोग्य विभागाच्या सर्व रिक्त पदांसाठी ही भरती परीक्षा जिल्हा निवड मंडळामार्फत घेतली जाणार आहे.

First Published on: September 20, 2022 8:26 AM
Exit mobile version