ठाण्यातील चिराक नगर परिसरात मागील 6 तासांत 123 मिमी पावसाची नोंद; मुंबईतही मुसळधार पावसाची शक्यता

ठाण्यातील चिराक नगर परिसरात मागील 6 तासांत 123 मिमी पावसाची नोंद; मुंबईतही मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईसह ठाण्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. ठाणे जिल्ह्यातील चिराक नगर परिसरात 123 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. ठाण्याच्या चिराक नगर परिसात 123 मिमी, नौपाडा परिसरात 112 मिमी आणि मुंब्रा परिसरात 96.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत जोरदार पावसाने बॅटींग केली आहे. (Heavy Rainfall alert in mumbai and thane by imd)

मुंबईत गुरूवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, शुक्रवारी सकाळीही पावसाची संततधार कायम आहे. विजांचा कडकडांट आणि जोरदार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पाणी साचत असल्याने रस्ते वाहतुकीला ब्रेक लागला असून, वाहतुक कोंडी निर्माण होत आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात साधारणपणे ढगाळ आकाश आणि मध्यम पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी अधूनमधून तीव्र सरी येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार 16 आणि 17 सप्टेंबर म्हणजे आज आणि उद्या मुंबईसह उत्तर कोकणातील काही भाग आणि घाट परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच उत्तर प्रदेश आणि आजूबाजूच्या भागात देखील हवामान विभागानं पावसाची शक्यता वर्तवली आहे.


हेही वाचा – काँग्रेसचे नेते रोहित टिळक भाजपच्या वाटेवर? पुण्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची घेतली गुप्त भेट

First Published on: September 16, 2022 4:08 PM
Exit mobile version