मुसळधार पावसामुळे मुंबईसाठी पुढील २ दिवस सतर्कतेचा इशारा

मुसळधार पावसामुळे मुंबईसाठी पुढील २ दिवस सतर्कतेचा इशारा

मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने (Rainfall) जोरदार बॅटींग केली आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) सखल भागांत पाणी साचले आहे. तसेच, पावसाचा जोर कायम राहिल्यास पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशातच हवामान विभागाकडून मुंबईसाठी (Mumbai) पुढील २ दिवस सतर्कतेचे इशारा देण्यात आला आहे. शिवाय, मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. (Heavy rainfall alert in mumbai konkan issued by imd)

राज्यात गेल्या ५ दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy rains) सुरु आहे. राज्यात सुरु असलेल्या या पावसात आत्तापर्यंत वेगवेगळ्या घटनात ७० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. हवामान खात्याने २ दिवस पावसाचा इशारा दिला आहे. प्रशासनाकडून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. जगबुडी, अंबा, सावित्री, पाताळगंगा, गढी आणि उल्हाससह अनेक नद्यांमधील पाणी धोक्याच्या पातळीच्या जवळ आहे. पावसामुळे बाधित झालेल्या सुमारे ५ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

मुसळधार पाऊस आणि जोराच्या वाऱ्यामुळे नागरिकांच्या घरांचे नुकसाना झाले आहे. पावसामुळे सखल भागांत पाणी साचल्याने घरांघरांत पाणी शिरले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीची पाहणी करण्यात आली असून गडचिरोली जिल्ह्यात १२ आणि १३ तारखेला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढील ४८ तासात गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रात्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थितीची पाहणी करुन बैठक घेतली. काल पावसाचा जोर कमी झाला आहे.


हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदे गडचिरोलीच्या दौऱ्यावर, संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी योजना राबवण्याचा निर्णय

First Published on: July 12, 2022 7:56 AM
Exit mobile version