घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदे गडचिरोलीच्या दौऱ्यावर, संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी योजना राबवण्याचा निर्णय

मुख्यमंत्री शिंदे गडचिरोलीच्या दौऱ्यावर, संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी योजना राबवण्याचा निर्णय

Subscribe

जिल्हाधिकारी संजय मीना व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी मुसळधार पावसामुळे जलपातळीत होणारी वाढ व त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

मुंबईः गडचिरोली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज गडचिरोली दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज एक विशेष बैठक गडचिरोली जिल्हा नियोजन भवनात पार पडली.

यावेळी दरवर्षी पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शा गावाबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित मेडिकल कॉलेज तातडीने सुरू करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यासाठी लागणारी पूर्तता तातडीने करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांना केल्या आहेत.

- Advertisement -

याच बैठकीत जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी जिल्हयातील पर्जन्यमान, पूरस्थिती, स्थलांतरितांबाबतची माहिती सादर केली. गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावर काही काळ थांबून प्रत्यक्ष पूरपरिस्थितीची पाहणी केली. जिल्हाधिकारी संजय मीना व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी मुसळधार पावसामुळे जलपातळीत होणारी वाढ व त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.


या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, विभागीय आयुक्त माधवी खोडे-चवरे, पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील, मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर, पोलीस अधीक्षक अंकित गोयल उपस्थित आहेत. तसेच तालुकास्तरावरून ऑनलाईन स्वरूपात उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व गटविकास अधिकारी सहभागी झाले होते.

- Advertisement -

हेही वाचाः राष्ट्रपती निवडणुकीतील पाठिंब्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेत फूट, ठाकरेंकडे सर्वाधिकार

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -