राज्यात पुढील चार दिवस मुसळधार

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार

सोमवारपासून पुढील चार दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. तर अनेक विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

राज्यात परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. गेल्या काही दिवसात गुलाब चक्रीवादळ आणि शाहीन चक्रीवादळाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पाऊस झाला. मराठवाड्याला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. विजांच्या कडकडाटासह, जोरदार झालेल्या पावसाने अनेक पिकांचे देखील नुकसान झाले. ऑक्टोबर महिन्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. रविवारी मुंबईसह उपनगरात पावसाने सुट्टी घेतली होती.

दरम्यान, पुढील चार ते पाच दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेरची कामे टाळा, पाऊस सुरू असताना घराबाहेर पडल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून घराबाहेर पडू नका. अशा प्रकारचे तीव्र हवामान संपूर्ण दिवस असेल, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

गेल्या ४-५ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने चांगलाच हाहाकार माजवला. कोकणात कमाल तापमान हे सरासरीच्या १ ते ३ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले तर मराठवाड्यासह विदर्भात देखील पावसाचा जोर वाढल्याचे पहायला मिळाले. गेल्या २ दिवसांपासून राज्यात उष्णतेचे प्रमाण वाढल्याचे पहायला मिळत आहे. ६ ऑक्टोबरपासून वायव्य भारतातील काही भागात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होणार आहे. पावसाळा संपून हिवाळा ऋतू सुरू होणार आहे त्यामुळे या काळात उष्णतेत वाढ होत आहे.

First Published on: October 3, 2021 11:55 PM
Exit mobile version