ढगांच्या गडगडाटासह मुंबईत पावसाची एन्ट्री; पुढील ३६ तासांत जोरदार पावसाचा अंदाज

ढगांच्या गडगडाटासह मुंबईत पावसाची एन्ट्री; पुढील ३६ तासांत जोरदार पावसाचा अंदाज

गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर उन्हाचा कडाका सहन करत आहेत. मात्र, आता मुंबईकरांना पुन्हा एकदा पावसाचा आनंद घेता येणार आहे. ह्युमिड झालेल्या वातावरणातून पुन्हा पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाने पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे. तसेच येत्या विकेंडला पुन्हा पाऊस बरसू शकतो त्यासोबतच मेघागर्जना आणि विजांच्या कडकडाटाचा अंदाज हवामान वेधशाळेने वर्तवला आहे. येत्या ३६ तासांत कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासह मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज आहे.

दरम्यान पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आता जात-जाता पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात १३ सप्टेंबरपासून पुढील ४-५ दिवस जोरदार पावसाचा तडाखा बसू शकतो. विषेश म्हणजे ११ सप्टेंबरपासून कोकणामध्ये पाऊस पुन्हा वाढण्याची शक्यता मुंबई वेधशाळेचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे.

येलो अर्लट (Yellow Alert) जारी

सध्या मुंबई, ठाणे, कल्याण याठिकाणी पावसाने हजेरी लावली असून शनिवारी जोरदार पाऊस बरसेल त्यासाठी येलो अर्लट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मुंबई वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ४ ते ७ वेळेत वीजांच्या कडकडाटांसह पाऊस बरसला आहे. तसेच ठाणे, नवी मुंबईमध्ये १०० मिमी पेक्षा अधिक पाऊस बरसला तर मुंबईच्या पूर्व भागातील शहरात ४० मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला. मात्र, त्यानंतर आभाळ निरभ्र झाले असून सध्या मुंबईच्या काही भागात रिमझिम पाऊस बरसण्यास सुरुवात झाली आहे.


हेही वाचा – पाऊस आला धावून, रस्ते गेले वाहून


 

First Published on: September 11, 2020 5:29 PM
Exit mobile version