घरमहाराष्ट्रनाशिकपाऊस आला धावून, रस्ते गेले वाहून

पाऊस आला धावून, रस्ते गेले वाहून

Subscribe

वडाळा गावातील परिस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

शाहाबाज खान : वडाळा गाव

परिसरातील शंभर फुटी रस्त्यापासून ते मुमताजनगरपर्यंत जाणार्‍या मुख्य रस्त्यासह अन्य रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. या मुख्य रस्त्यासह परिसरातील सर्वच छोट्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून गैरसोय टाळण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

- Advertisement -

परिसरातील या एक ते दीड किलोमीटर रस्त्याची परिस्थिती अत्यंत खराब असून नागरिकांना खड्ड्यात हरवलेल्या रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. दुचाकी वाहनचालकांना चिखलातून वाट शोधावी लागत असल्यानेे छोट्या-मोठ्या अपघतांसह वाहने घसरण्याचेही चित्र बघावयास मिळत आहे. तारेवरची कसरत करत वाट शोधणार्‍या या वाटसरूंच्या आरोग्याचाही प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. मुख्य म्हणजे, चांगल्या रस्त्याची काही कामांसाठी वाट लावल्यानंतर पुन्हा त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांच्या रोषात भर पडत आहे.

damage road in wadala
वडाळा गावातील चांगल्या रस्त्याची पुन्हा वाताहत

चांगल्या रस्त्याची पुन्हा वाताहत

काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम केले गेले होते. परंतु त्यानंतर भुयारी गटारचे काम सुरु करण्यात आले. हे काम पूर्ण झाल्यानंतर खोदकाम केलेल्या रस्त्याचे कामच करण्यात आले नाही. परिणामी, चांगला रस्ता खराब झाला. आजघडीला या रस्त्याला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्नः प्रशासन आणि लोकप्रतिनिधीकडे नागरिकांकडून विचारला जात आहे.

- Advertisement -

main road wadala

वाहन फसण्यासह अपघात वाढले

पावसाळ्यात ही गंभीर स्थिती नित्याचीच झाली आहे. तुरळक पाऊस झाला तरी रस्त्यावर मोठ-मोठ खडे पडतात, या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन फसण्याचे तसेच अपघाताचे प्रकार घडत आहेत. यामुळे वाहनांचे मेंटेनन्सही वाढत असल्याच्या तक्रारी आहेत. पालिकेच्या संबंधित विभागकडून तात्पुरत्या स्वरूपात मुरूम आणि खडीकरण केले जाते, परंतू एका पावसात रस्त्याची पुन्हा वाताहत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -