Weather Alert: येत्या २४ तासांत महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Weather Alert: येत्या २४ तासांत महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

प्रातिनिधीक फोटो

गेल्या काही दिवसांपुर्वी महाराष्ट्राला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र येत्या २४ तासांत महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यानुसार, मुंबई शहरात काही ठिकाणी मध्यम ते हलका स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे ठाणे, रायगड जिल्ह्यात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस

कुलाबा वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्यात विदर्भात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडू शकतो. तर विदर्भ, मराठवाडा तसंच उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने स्थानिक यंत्रणादेखील सतर्क झाली आहे. नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सर्वाधिक धरणं पाण्याने भरली

जुलै महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये राज्याला चांगलेच झोडपून काढले होते. त्यामुळे काही आठवड्यांआधी झालेल्या पावसाची सरासरीपेक्षा ८ टक्के जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे दिलासादायक बाब म्हणजे सर्वाधिक धरणं पाण्याने भरून गेली आहेत.

पाणी कपातीचे संकट टळले

सर्वसाधारणपणे ऑगस्ट महिन्यात राज्यातली बहुतांश धरणं भरून वाहू लागतात आणि सांगली, कोल्हापूरसारख्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते. पण यंदा मात्र, जुलै महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईसह पुण्यात पाणी कपात संकट ओढावल्याचे सांगितले जात होते. पण ऑगस्ट महिना सुरू होताच हे संकट टळले आहे.


सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; UGC च्या परीक्षा होणारच
First Published on: August 28, 2020 12:10 PM
Exit mobile version