आजपासून मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद

आजपासून मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद

गणेशोत्सवानिमित्ताने सध्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर चाकरमान्यांना प्रवास करताना अडथळा होऊ नये. यासाठी आजपासून मुंबई-गोवा महार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. रत्नागिरी पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक जास्त वाहतूक करणाऱ्या वाहनांवर बंदी घातली जाणार आहे. गणेशोत्सवात कोणताही अपघात होऊ नये म्हणून हा खबदारीचा उपाय करण्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये, चाकरमान्यांच्या समोर कोणतेही विघ्न येऊ नये. तसेच सध्या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे रखडलेले काम याचा फटका कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना बसू नये यासाठी रत्नागिरी पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वाहतूक करणारी अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या दिवस अवजड वाहतूक बंद असणार 

पुढील दोन दिवस म्हणजेच आज आणि उद्या अवजड वाहतूक बंद असणार आहे. त्यानंतर १९ ऑगस्ट सकाळी ८ ते २२ ऑगस्ट सकाळी ८ पर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. मग त्यानंतर २८ ऑगस्ट ते २९ ऑगस्टला देखील अवजड वाहतूक बंद असणार आहे. तसेच चाकरमान्यांच्या परतीच्या वेळी म्हणजेच १ सप्टेंबर ते २ सप्टेंबरपर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात अत्यावश्यक आणि जीवनाश्यक वाहनांची वाहतूक चालू ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.


हेही वाचा – उद्यापासून अकरावी प्रवेशाचा दुसरा टप्पा सुरू होणार


 

First Published on: August 11, 2020 9:46 AM
Exit mobile version