पुण्यात चालकासह मागे बसणाऱ्यावरही हेल्मेट सक्ती

पुण्यात चालकासह मागे बसणाऱ्यावरही हेल्मेट सक्ती

पुणे शहरात १ जानेवारी पासून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. या हेल्मेट सक्तीला पुण्यात मोठ्या प्रमाणात विरोध देखील करण्यात आला. मात्र या विरोधाला झुगारत पोलिसांनी धडक कारवाई केली. त्यानंतर आता चालकासह मागे बसणाऱ्याला देखील हेल्मेट सक्तीचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे पोलिसांना पुन्हा एकदा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, या हेल्मेट सक्ती संदर्भात पुणे वाहतुक पोलिसांची ठाम भूमिका आहे. या नव्या नियमा विषयी लोकांना माहिती होण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती देखील करण्यात येणार आहे. या संदर्भात वाहतुक पोलिस आयुक्त पंकज देशमुख यांनी माहिती दिली.

नागरिक कसा प्रतिसाद देणार?

१ जानेवारी पासून न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे अंमलबजावणी करुन कारवाई करताना वर्षाच्या सुरवातीलाच पोलिसांनी ७ हजार ४९० जणांवर कारवाई करत ३ लाखांपेक्षा अधिकच्या दंडाची वसुली केली. हेल्मेट सक्ती विरोधात पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात रोश व्यक्त केला. अनेक राजकीय पक्ष, वेगवेगळ्या संघटनांनी देखईल याला विरोध केला. हेल्मेट मुळे मानेचा त्रास होतो, गाडी चालवताना बाजुचा तसेच माघण येणारा माणुस दिसत नाही, केस गळतात, सांभाळण्यास त्रास होतो, अशा अनेक समस्या पुणेकरांच्या आहेत.

अपघातांमुळे निर्णय

१ जानेवारी पासून हेल्मेट सक्ती करण्यात आली असून दंडात्मक कारवाई पुणे वाहतुक पोलीस करतच आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून दुचाकीच्या मागे बसणारे लोक देखील अपघातने मृत्यूमुखी पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळेच मागे बसणाऱ्या वक्तींवर देखीस दंडात्मक करावाई करण्याचा निर्णय पुणे वाहतुक पोलिसांनी घेतला आहे. या बाबत वाहतुक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी माहिती दिली आहे.

 

 

First Published on: March 22, 2019 10:18 PM
Exit mobile version