Hemant Dhome : …पण कृपया स्वतःची काळजी घ्या, मराठी कलाकाराची शरद पवारांसाठी पोस्ट

Hemant Dhome : …पण कृपया स्वतःची काळजी घ्या, मराठी कलाकाराची शरद पवारांसाठी पोस्ट

...पण कृपया स्वतःची काळजी घ्या, मराठी कलाकाराची शरद पवारांसाठी पोस्ट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे आज सोमवारी (ता. 06 मे) होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पवारांची प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आपला हा निर्णय घेतला आहे. काल रविवारी (ता. 05 मे) बारामती येथे मविआच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी झालेल्या सांगता सभेतच पवारांना अस्वस्थ वाटू लागले होते, ज्यामुळे त्यांनी त्या सांगता सभेत केवळ चार ते पाच मिनिटेच भाषण केले. पण या सभेनंतर त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना डॉक्टरांनी दोन दिवस आराम करण्याचा सल्ला दिला. (Hemant Dhome post for Sharad Pawar on Social Media for health update)

शरद पवार यांनी स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. त्यांनी त्यांची प्रकृती सांभाळावी, असे सगळ्यांकडूनच सांगण्यात येत आहेत. एका मराठी कलाकारानेही शरद पवार यांच्यासाठी भावूक पोस्ट लिहिली आहे. पवारांनी स्वतःची तब्येत जपावी, अशी पोस्ट या मराठी कलाकाराकडून करण्यात आली आहे. हा मराठी कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून मराठी अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे आहे. शरद पवार यांच्यासाठी हेमंत ढोमे याने X या सोशल मीडिया साइटवर शरद पवार यांच्या फोटोसहित पोस्ट लिहिली आहे. त्याच्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांकडून नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोन्ही प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

हेही वाचा… Sharad Pawar : तुम्ही तब्येत जपा, महाराष्ट्र दिल्लीसमोर न झुकण्याचा इतिहास…; उमेदवाराची भावनिक पोस्ट

काय आहे हेमंत ढोमेची पोस्ट?

“आदरणीय साहेब… आपली मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी आम्हा तरूणांना देखील थक्क करणारी आहे… पण कृपया स्वतःची काळजी घ्या… तब्येत जपा… खंडोबा आपणांस लवकरात लवकर बरे करो… 🙏🏽” असे लिहित अभिनेता हेमंत ढोमे याने शरद पवार यांचा फोटो या पोस्टमधून शेअर केला आहे. त्यामुळे हेमंत ढोमे याला शरद पवारांविषयी असलेले प्रेम या पोस्टच्या माध्यमातून दिसून येत आहे.

हेही वाचा… Sharad Pawar : प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवारांचे सोमवारचे कार्यक्रम रद्द


Edited By : Poonam Khadtale

First Published on: May 6, 2024 3:58 PM
Exit mobile version