घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रSharad Pawar : तुम्ही तब्येत जपा, महाराष्ट्र दिल्लीसमोर न झुकण्याचा इतिहास...; उमेदवाराची...

Sharad Pawar : तुम्ही तब्येत जपा, महाराष्ट्र दिल्लीसमोर न झुकण्याचा इतिहास…; उमेदवाराची भावनिक पोस्ट

Subscribe

महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही हा इतिहास आहे आणि तो आम्ही जपू, तुम्ही फक्त तुमच्या तब्येतीला जपा, असे आवाहन बजरंग सोनावणे यांनी केले आहे.

पुणे : मविआच्या बारामती लोकसभेतील (Baramati Constituency) उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासाठी रविवारी (5 मे) झालेल्या सांगता सभेत शरद पवार (Sharad Pawar) यांनी अगदीच चार ते पाच मिनिटे भाषण केले. या सभेत बोलताना त्यांच्या आवाजात कातरपणा जाणवला. तसेच, घसा बसल्याने त्यांना शब्दही नीट बोलता येत नव्हते. शरद पवार यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे आजचे त्यांचे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर आता बीड (Beed) लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) यांनी शरद पवार यांना तब्येतीला जपण्याचे आवाहन केले आहे. तसेच महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही हा इतिहास आहे आणि तो इतिहास आम्ही जपू, असेही म्हटले आहे. (Lok Sabha Election 2024 Sharad Pawar health Bajrang Sonawane)

बजरंग सोनावणे यांनी रविवारी रात्री उशिरा ट्वीट करताना म्हटले की, शरद पवार तुम्ही तब्येतीच्या कारणास्तव उद्या माझ्या प्रचारार्थ आयोजित आष्टीतील सभेला येणार नाही समजलं आणि साताऱ्याच्या सभेची आठवण झाली. तेव्हा तुम्ही पावसाला थांबू शकला नव्हतात, पण तेव्हा पाऊसही तुम्हाला थांबू शकला नाही. तुमची तब्येत खराब झाल्याचे कळले. मागील पाच-सहा दशके अशा निवडणुका कित्येक बघितल्या असतील तुम्ही. त्या तुमच्या नावावरच झाल्या.

- Advertisement -

मागील कित्येक दशके महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीला अभिमानानं आव्हान देतो आहे, पण शरद पवार आता तुम्ही आमचं ऐका, ही खिंड आम्हालाच लढू द्या. विपरीत परिस्थितीत लढणं हे तुम्ही या देशाला दाखवून दिलं आहे. त्यामुळे विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो. आता पुढची जबाबदारी आमची. ही निवडणूक आता शरद पवारांचे कार्यकर्ते म्हणूनच आम्हाला लढू द्या. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही हा इतिहास आहे आणि तो इतिहास आम्ही जपू, तुम्ही फक्त तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहु द्या, असे भावनिक ट्वीट बजरंग सोनावणे यांनी केले आहे.

हेही वाचा – Pawar VS Pawar : तुमच्याप्रमाणे माझे मगरीचे नक्राश्रू नाहीत; रोहित पवारांचे अजितदादांना जोरदार प्रत्युत्तर 

- Advertisement -

शरद पवारांची तब्येत बिघण्याचे कारण काय? (Sharad Pawar’s health)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शरद पवार मविआच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेताना दिसत आहेत. राज्यातील प्रत्येक कोना पिंजून काढायचा निर्धारच शरद पवारांनी केला आहे. त्यामुळे ते निवडणुकीच्या प्रचारासाठी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यात जाहीर सभा घेत आहेत. या सभांसाठी गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी हजारो किमींचा प्रवासही केला आहे. त्यांनी केलेल्या धावपळीचा ताण त्यांच्या प्रकृतीवर आला असून त्यांची तब्येत बिघडली आहे. काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात निलेश लंके यांच्या प्रचारासाठी आल्यानंतर त्यांनी आपला घसा बसल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही त्यांनी आपल्या प्रचारसभा थांबवल्या नाहीत. पण रविवारी बारामतीमध्ये सभा घेताना त्यांची प्रकृती खालावल्याचे दिसून आले. असे असतानाही त्यांनी काही मिनिटे का असेना पण आपल्या भाषणातून विरोधात बसलेल्या सत्ताधाऱ्यांना दम भरण्याचे काम केले.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : पंडितांची घरवापसी का होऊ शकलेली नाही? ठाकरे गटाचा मोदी सरकारला सवाल


Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -