मुंबईकरांसाठी स्वस्त दरात आरोग्य सुविधा पुरवणारे ‘हे’ नवे हेल्थ सेंटर सुरू होणार

मुंबईकरांसाठी स्वस्त दरात आरोग्य सुविधा पुरवणारे ‘हे’ नवे हेल्थ सेंटर सुरू होणार

MBBS नंतर इतर कॉलेजमध्ये आता इंटर्नशिप करता येणार नाही, NMC ने नियमात केला बदल

मुंबईत (Mumbai) सध्या मुसळधार पाऊस पडत असून साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. तसेच, कोरोना प्रादुर्भाव या दुहेरी संकटांमुळे मुंबईकरांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहेत. शिवाय एखाद्या आजराची लागण झाल्यास स्वस्त दरात आरोग्य सुविधा मिळावी यासाठी अनेकदा काहीजण पालिकेच्या दवाखान्यात धाव घेतात. मात्र आता मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईकरांना ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हेल्थ सेंटर्स’ (Hinduhridayasamrat Balasaheb Thackeray Health Centers) या नव्या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून कमी किमतीत आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे.

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हेल्थ सेंटर्स’ हे आरोग्य केंद्र (Health Centers) दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत सुरू राहणार असून, येत्या १५ ऑगस्टपर्यंत सुरू होणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या घराजवळ आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे मुंबईत असलेल्या झोपडपट्टी परिसरात हे आरोग्य केंद्र सुरू केले जाणार आहे. (hinduhridayasamrat balasaheb thackeray health centres start from august 15 low cost healthcare available for mumbaikar)

जवळपास ७० दवाखाने उभारले जाणार असल्याची योजना आहे. तसेच, यासाठी काही जागांची निवड करण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रामुळे किमान १० ते १५ एचबीटी क्लिनिक आणि १३ पॉलीक्लिनिक सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील आरोग्य पायाभूत सुविधांना चालना मिळेल आणि नागरिकांना कमी खर्चात आरोग्य सुविधा उपलब्ध होईल. याशिवाय प्रत्येक विभागातील विशेष डॉक्टर आणि तज्ञही सेवेसाठी उपलब्ध असणार आहे.

शहरातील आरोग्य सेवेला चालना देण्यासाठी या प्रकल्पाच्या भांडवली खर्चासाठी २५० कोटी रुपये आणि महसुली खर्चासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

एचबीटी क्लिनिक सामान्य आजार हाताळेल, परंतु जर समस्या थोडी गंभीर असेल आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, त्वचारोग तज्ञ, हृदयरोग तज्ञ इत्यादी तज्ञांची आवश्यकता असेल तर रुग्णांना जवळच्या एचबीटी पॉलीक्लिनिकमध्ये पाठवले जाईल.

महापालिकेच्या २०२२-२३ या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रांची निर्मिती करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, यामध्ये पहिल्या टप्प्यात १०० आणि त्यानंतर १०० अशी २०० केंद्रे उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.


हेही वाचा – ‘या’ रेल्वे मार्गावर आज दोन तासांचा इमरजन्सी ब्लॉक, पर्यायी मार्ग जाणून घ्या!

First Published on: July 7, 2022 5:02 PM
Exit mobile version