हिंगोलीत SRPFच्या १८४ जवानांच्या चाचण्या निगेटिव्ह

हिंगोलीत SRPFच्या १८४ जवानांच्या चाचण्या निगेटिव्ह

चाचण्या निगेटिव्ह

मालेगाव येथून बंदोबस्तावरुन हिंगोलीत परतलेल्या एसआरपीएफच्या सहा जवानांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मंगळवारी समोर आली होती. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र, आज एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. मुंबईहून आलेल्या अन्य १८८ एसआरपीएफ जवानांचे घशातील लाळेचे नमुने तपासणी करता पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज आला असून १८४ जवानांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर उर्वरीत चार जवानांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली आहे.

हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बारामधील १०७ अधिकारी आणि जवान मालेगाव येथून ८४ जवान मुंबई येथून बंदोबस्त आटोपून हिंगोलीमध्ये सोमवारी परतले होते. दरम्यान, या १९४ अधिकारी आणि जवानांचे घशातील नमुने चाचणीसाठी औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले होते. या चाचणीचे मंगळवारी आलेल्या अहवालात सहा जवानांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून आज आलेल्या अहवालातील १८४ जवानांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे आरोग्य प्रशासनाने सांगितले आहे. तर ४ जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत.

राज्यात ४३१ नव्या रुग्णांची नोंद

राज्यात ४३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ५६४९ झाली आहे. १८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज ६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण ७८९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याचे आरोग्य खात्यामार्फत सांगण्यात आले आहे. आज राज्यात १८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील १०, पुणे येथे २, औरंगाबाद येथे २ तर कल्याण डोंबिवली येथे १, सोलापूर मनपा येथे १, जळगाव येथे १आणि मालेगाव येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा  – पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ एप्रिलला सर्व मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद


 

First Published on: April 22, 2020 10:13 PM
Exit mobile version