घरCORONA UPDATEपंतप्रधान नरेंद्र मोदी २७ एप्रिलला सर्व मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ एप्रिलला सर्व मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ एप्रिलला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ एप्रिलला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत. हा संवाद व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. गेल्या महिन्याभरातली ही अशा पद्धतीची तिसरी बैठक असणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेत येत्या ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता येत्या बैठकीत लॉकडाऊन संदर्भात काही चर्चा होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांचा कल जाणून घेतला. त्यानंतर १४ एप्रिलला लॉकडाऊनची मुदत संपत होती. त्यापूर्वीच १० एप्रिलला पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेत ३ मे ही मुदत वाढवली. त्यामुळे ही मुदत संपण्यापूर्वी पुन्हा आता पंतप्रधान देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे आता सोमवारी होणाऱ्या बैठकीतही राज्यांचे लॉकडाऊन वाढवण्याबाबत काय मत आहे, याचा अंदाज घेतला जाईल.

याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच राज्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांसाठी विशेष ट्रेन पाठवण्याबाबत वेळीच नियोजन करण्याचा पुनरुच्चार केंद्राकडे केला होता. त्या मागणीबाबत केंद्राकडून काही प्रतिसाद येतो का हेही पाहावे लागणार आहे.

- Advertisement -

राज्यात ४३१ नव्या रुग्णांची नोंद

राज्यात ४३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ५६४९ झाली आहे. १८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज ६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण ७८९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याचे आरोग्य खात्यामार्फत सांगण्यात आले आहे. आज राज्यात १८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील १०, पुणे येथे २, औरंगाबाद येथे २ तर कल्याण डोंबिवली येथे १, सोलापूर मनपा येथे १, जळगाव येथे १आणि मालेगाव येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – Coronavirus: आज राज्यात ४३१ नव्या रुग्णांची नोंद; १८ रुग्णांचा मृत्यू


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -