Kirit Somaiya Dapoli Visit : कायदा हातात घेतल्यास पोलीस कारवाई करणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

Kirit Somaiya Dapoli Visit : कायदा हातात घेतल्यास पोलीस कारवाई करणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

भाजप नेते किरीट सोमय्या आज सकाळी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टवर हातोडा मारण्यासाठी दापोलीकडे रवाना झाले आहेत. परंतु कायदा हातात घेतल्यास पोलीस कारवाई करणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील म्हणाले.

कायदा हातात घेतल्यास पोलीस कारवाई करणार

कोणालाही कुठलीही लढाई लढायची असेल तर ती कायदेशीर मार्गाने लढली पाहीजे. कोणीही कायदा हातात घ्यायची गरज नाही. अशा प्रकारचा कायदा हातात घेऊन चुकीच्या पद्धतीने त्याठिकाणी ट्रेसपासिंग करण्यात आलं. त्यामुळे पोलीस नियमाप्रमाणे जी काही कारवाई करावी लागेल, ती कारवाई त्यांच्याकडून केली जाईल.

वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न

खोटे-नाटे आरोप करायचे ही एक नवीन पद्धत आहे. त्यानंतर केंद्रीय एजन्सीची भिती दाखवायची. भ्रष्टाचाराचे आरोप दाखल करायचे. जो संबंध नाही तो संबंध जोडायचा आणि वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करायचा. एका बाजूला कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत आहे, असं म्हणायचं. तर दुसरीकडे लहान लहान गोष्टीवरून मोठे मोठे मोर्चे काढून त्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा.

सरकारची प्रतिमा या गोष्टींमुळे बिघडणार नाही

सरकारची प्रतिमा या गोष्टींमुळे बिघडणार नाही, मला असं वाटतं. कारण आम्ही पारदर्शन पद्धतीने काम करतो आणि भविष्य काळात सुद्धा करत राहणार असं दिलीप वळसे-पाटील म्हणाले.

अत्याचाराच्या घटना घडू नये यासाठी पोलीस प्रयत्न करणार

ज्या अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत किंवा समोर आलेल्या आहेत. त्यामध्ये बऱ्याचशा घटना या जवळच्या किंवा ओळखीच्या नातेवाईकांकडून घडलेल्या आहेत. त्यामुळे हा एक अतिशय चिंतेचा विषय आहे. आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या या सर्व गोष्टी आणि त्याच्यामधून घडणाऱ्या या घटना त्यासंदर्भात पोलिसांना अलर्ट राहण्यास सांगितलं आहे. पोलीस त्याचा शोध घेऊन आणि अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रयत्न करणार आहेत.


हेही वाचा : Kirit Somaiya: सोमय्यांनी कायदा हातात घेतला तर…. – शंभूराज देसाईंचा इशारा


 

First Published on: March 26, 2022 4:55 PM
Exit mobile version