पुणे परिसरात घरफोड्या करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या

पुणे परिसरात घरफोड्या करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या

घरफोड्या करणाऱ्या टोळीला हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोड्या करणाऱ्या तीन जनांच्या टोळीच्या हिंजवडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. नारायण जालिंदर वय-२१, रोहित शिंदे, प्रसाद शिंदे अशी घरफोड्या करणाऱ्या टोळीतील सदस्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन लाख पंचवीस हजारांचा किंमतीचा घरफोडीतील ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ऐकून १२ गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे.

घरफोड्या करणाऱ्या टोळीकडून मुद्देमाल हस्तगत

घरफोडी करणारा सराईत २१ वर्षीय गुन्हेगार नारायण जालिंदर कानडे याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने बेंगलोर-मुंबई मार्गावरील टॉयेटो शोरूम, ऑडी शोरूम, मारुती सुझुकी शोरूम, अशा १२ ठिकाणी त्याने आणि साथीदार प्रसाद शिंदे, निखिल थोरात, रोहित शिंदे, किरण बोत्रे, इम्रान सय्यद यांनी चोरी केल्याची कबुली दिली. पैकी, आरोपी रोहित आणि प्रसाद यांना अटक करून त्यांच्याकडून घरफोडीतील चोरीचे २२५२०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हिंजवडी, पौड, सिंहगड, चंदननगर, भारती विद्यापीठ, लोणीकंद, या पोलीस ठाण्याच्या परिसरात आरोपीनी घरफोड्या केल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, गुन्हे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक गिझे, वरुडे, महेश वायबसे, पोलीस कर्मचारी बाळकृष्ण शिंदे, किरण पवार, नितीन पराळे, अतिक शेख, कुणाल शिंदे, विवेक गायकवाड, हनुमंत कुंभार, रितेश कोळी, आकाश पांढरे, विकी कदम यांनी केली आहे.


राज्याचे नेतृत्व शिवसेनेचाच मुख्यमंत्री करेल – संजय राऊत
First Published on: November 7, 2019 6:49 PM
Exit mobile version