घरमुंबईराज्याचे नेतृत्व शिवसेनेचाच मुख्यमंत्री करेल - संजय राऊत

राज्याचे नेतृत्व शिवसेनेचाच मुख्यमंत्री करेल – संजय राऊत

Subscribe

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन १४ दिवस उलटले आहेत. मात्र, अध्यापही राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. भाजपला निवडणुकीत १०५ तर शिवसेनाला ५६ जागांवर यश आले आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी दोघांना परस्परांची गरज लागणार आहे. मात्र, दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदावर अडून बसले आहेत.

‘महाराष्ट्राचे नेतृत्व शिवसेनेचाच मुख्यमंत्री करेल’, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले आहेत. राजभवन बाहेर भाजप नेत्यांच्या पत्रकार परिषदेनंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राजभवनच्या बाहेरील भाजप नेत्याची पत्रकार परिषद ऐकली असल्याचे सांगितले. ‘चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत वारंवार सांगत होते की महायुतीला जनादेश आला आहे. मग तुम्ही सत्ता स्थापन का करत नाही? महायुती घोषित करण्याअगोदर शिवसेना आणि भाजप पक्षात काही ठराव झाले होते. ते ठराव लोकांसमोर ठेवले गेले होते आणि त्या ठरावांना जनादेश मिळाला आहे. राज्याचे नेतृत्व शिवसेनेचाच मुख्यमंत्रीच करु शकतो’, असे संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा – भाजपकडून आज सत्ता स्थापनेचा दावा नाही

- Advertisement -

शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन १४ दिवस उलटले आहेत. मात्र, अध्यापही राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. भाजपला निवडणुकीत १०५ तर शिवसेनाला ५६ जागांवर यश आले आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी दोघांना परस्परांची गरज लागणार आहे. मात्र, दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदावर अडून बसले आहेत. ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री, असे धोरण शिवसेनेचे आहे. तर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असे लोकसभा निवडणुकीच्या काळातच भाजपसोबत ठरले होते, असे शिवसेनेने म्हटले होते. दरम्यान, शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम राहिल का? असा प्रश्न जेव्हा राऊत यांना विचारण्यात आला तेव्हा ‘शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे नेहमी आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेले आहेत. खरंतर हा प्रश्न तुम्ही भाजपला विचारायला पाहिजे’, असे राऊत म्हणाले.

‘मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा हे सर्वांचे मत’

‘महाराष्ट्रात सध्या जी अस्थिरता निर्माण झाली आहे त्यामुळे राज्याचे नुकसान होत आहे. राज्यात सरकार बनेल आणि त्याचे नेतृत्व शिवसेनेचाच मुख्यमंत्री करेल. महाराष्ट्रात निवडून आलेल्या सर्व पक्षाच्या नेत्यांचे आणि आमदारांचे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असावा असे मत आहे’, असे संजय राऊत म्हणाले. दरम्यान, ‘आज आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सर्व आमदारांनी एकमुखाने उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला आहे. जो निर्णय उद्धव ठाकरे घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे सर्व आमदार म्हणाले आहेत’, असे देखील राऊत यांनी सांगितले.

- Advertisement -

‘युती तोडणार नाही’

‘२४ तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्याच दिवशी उद्धव साहेबांनी युती तोडणार नाही हेच सांगितले होते. त्यानंतर विधीमंडळ नेता ठरवण्याच्या आमदारांच्या पहिल्या बैठकीतही युती तोडण्याचे पाप मी करणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरेंची ती भूमिका आजपर्यंत कायम आहे’, असे संजय राऊत म्हणाले. त्याचबरोबर ‘सत्तेचा माज जेव्हा असतो तेव्हा साम, दाम, दंड, भेद या मंत्राचा वापर केला जातो. सत्तेचा माज जेव्हा असतो तेव्हा अशा प्रकारचा मंत्र वापरला जातो. आता सत्तेचा माज आणि मस्ती उतरली आहे’, असेही संजय राऊत म्हणाले.

‘भाजपचा दबाव संविधान विरोधात’

”शिवसैनिक खोटे बोलत नाही शिवसैनिक दिलेल्या शब्दाला जागतो. शिवसैनिक सत्तेसाठी खंजीर खुपसत नाही. प्राण जाये पण वचन न जाय हीच शिवसेनेची व्याख्या आहे. सत्ता स्थापनेसाठी ८ नोव्हेंबर ही मुदत आहे. त्याअगोदर नवे सरकार होणे बंधणकारक आहे. भाजपचे सरकार नाही होत याचा अर्थ भाजप बहुमत सिद्ध करु शकत नाही. मात्र, भाजप महाराष्ट्रावर राष्ट्रपती लागवट सोपवत आहे. हे जनतेच्या विरोधात आहे. जे लोकशाहीच्या विरोधात आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात तुम्ही जात आहात. राज्यपालांकडे तुम्ही जात आहात तर १४५ बहुमतची यादी तुम्ही राज्यपालांकडे सोपवायला हवी. भाजप जो दबाव आणत आहे ते संविधानाच्या विरोधात आहे’, असे संजय राऊत म्हणाले.

‘सरकार स्थापन करा नाहीतर लोकांना सांगा तसं’

‘बहुमत आहे तर सरकार स्थापन करा नाहीतर लोकांना सांगा तसं. आता हा खेळ जुना झाला आहे. हा खेळ परत चालणार नाही. संविधान तुमची जहांगीर नाही आणि आम्ही देखील संविधानाच्या नियमांनुसार माहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवू. भाजपने जाहीर करावे की आम्ही सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे जाहीर करावे. मग आम्ही हालचाल सुरु करू’, असेही संजय राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -