गृहविलगीकरणातील रुग्णांना उपचारासाठी घरपोच किट मिळणार, आरोग्यमंत्री टोपेंची माहिती

गृहविलगीकरणातील रुग्णांना उपचारासाठी घरपोच किट मिळणार, आरोग्यमंत्री टोपेंची माहिती

राज्यात गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्तीचा विचार; आरोग्यमंत्र्यांचे सुचक वक्तव्य

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडूनही उपाययोजना राबवल्या जात आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहविलगीकरणातील रुग्णांना उपचारासाठी घरपोच किट देण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिलीय.

आरोग्य मंत्री राजेश टोपे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. गृहविलगीकरणातील रुग्णांना उपचारासाठी घरपोच किट देण्यात येणार आहे, तसेच विलगीकरणाच्या कालावधीत रुग्णाला कॉल करून तीन वेळा त्याची विचारपूस करण्यात येणार आहे. आता कलेक्टरनं होम आयसोलेशन किट तयार केले पाहिजेत.

जे जे लोक होम आयसोलेटेड आहेत किंवा जे लोक पॉझिटिव्ह आहेत, जे घरी इलाज घेत आहेत, तर त्यांच्यासाठी आम्ही 20 एमएल सॅनिटायझर, 10 मास्क, माहितीपुस्तिका, 10 पॅरासिटेमॉलच्या टॅब्लेट, 20 मल्टिव्हिटामिनच्या टॅब्लेट, होम आयसोलेशन किट हे प्रत्येक घरी असणाऱ्या व्यक्तीला देण्याच्या दृष्टिकोनातून कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत, अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिलीय.

क्वारंटाईन रुग्णांना कॉल करणार

कॉल सेंटरवरून रुग्णाला कॉल जाणार असल्याचीही माहिती राजेश टोपेंनी दिलीय. कॉल सेंटरवरून ही प्रक्रिया पार पडणार आहे. रुग्णांची विचारपूस कॉलद्वारे करण्यात येणार आहे. रुग्णाला अडचण आल्यास त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात यावं, यासाठीही प्रकिया सुरू करणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच डॅशबोर्ड तयार करून रुग्णांना सर्व माहिती व्यवस्थित मिळावी, याची खबरदारी घेतली जाणार आहे, यात रुग्णांना बेड आणि औषधांबाबत माहिती मिळणार आहे.

बेड व्हेंटिलेटरची तपासणी आरोग्य विभागाकडूनच

लसीकरणात महाराष्ट्रात आणखी वेग वाढण्याची गरज आहे, असे मत केंद्राकडून नोंदवण्यात आले आहे, त्यामुळे लसीकरण आणखी वेगवान होणार आहे. ऑक्सिजन निर्मितीचे 404 प्लांट सुरू झाले आहेत, येणाऱ्या आठ ते दहा दिवसात आणखी 100 प्लांट सुरू होणार असल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली. बेड व्हेंटिलेटरची तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. ईसीआरटीटूच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून काही निधी देण्यात आल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली.

First Published on: January 11, 2022 1:35 PM
Exit mobile version