कोरोना काळात आई-वडिलांचे छत्र गमावलेल्या मुलांना हॉटेल मालकाने घेतले दत्तक !

कोरोना काळात आई-वडिलांचे छत्र गमावलेल्या मुलांना हॉटेल मालकाने घेतले दत्तक !

कोरोना काळात आई-वडिलांचे छत्र गमावलेल्या मुलांना हॉटेल मालकाने घेतले दत्तक !

गेल्या दिड वर्षापासून जगभरामध्ये कोरोना व्हायरसचे संकट आल्यापासून प्रत्येक व्यक्ती आर्थिक,मानसिक संकटाचा सामना करत आहे. इतकच नाही तर अनेकांना अत्यंत बिकट परीस्थितीचा सामना करावा लागला. अशातच कोरोनाकाळात अनेक लहान मुलांच्या पालकांचे निधन झाल्याने त्यांचे भविष्य आंधारात जात असल्याचे दिसताच मुरलीधर राऊत यांनी मदतीसाठी पुढाकार घेत आई वडिलांचे छत्र गमावलेल्या बाळापूर तालुक्यातील दहा मुलांच्या पालनपोषणाची मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. राऊत यांच्या कौतूकास्पद कमगिरी बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या विषेश कार्यकमात राऊत यांच्या कामाची दखल घेत त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले होते. पारस फाट्यावर अणाऱ्या राऊत यांचा हॉटेल वेगवेगळ्या उपक्रमांनी नेहमीच चर्चेत असते. गेल्या वर्षी लॉकडाऊन काळात मुरलीधर राऊत यांनी परराज्यात पायी जाणाऱ्यां लोकासांठी मोफत अन्नाचे वाटप केलं होते.

यानंतर त्यांनी समाजाचे काही देणे लागतो या विचारातून त्यांनी अनाथ मुलांसह आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींचे स्वखर्चाने लग्न लावून दिले. अता पुन्हा एकदा त्यांनी सामाजिक दायित्व जपत कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या मुलांच्या मदतीसाठी ते समोर आले आहेत. त्यांचे कार्य पाहून, सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक पी.टी. पाटील, मनोहर बचाटे यांनीसुद्धा दोन मुलांना २० वर्षांसाठी दत्तक घेत, त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे.



हे हि वाचा – SSC Result 2021: बैठक क्रमांकच माहित नाही? निकाल पाहू कसा ? वेबसाईटवर माहिती उपलब्ध



 

First Published on: July 16, 2021 11:59 AM
Exit mobile version