Coronavirus: एसटीतून नवरा बायको करू शकणार एकत्रित प्रवास

Coronavirus: एसटीतून नवरा बायको करू शकणार एकत्रित प्रवास

राज्यभरात वेगाने फैलावत असलेल्या करोना विषाणूचा परिणाम सर्वच घटकांवर होत असताना एसटी महामंडळावरही झाला आहे. एसटीच्या प्रवासामध्ये करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवाशांच्या बैठक व्यवस्थेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला होता. परिणामी एसटी महामंडळाचा प्रवासी संख्येत मोठी घट दिसून आली आहे. मात्र आता नवरा बायको असणाऱ्यांना एकाच आसणावर बसण्याची मुभा एसटी महामंडळानी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील दाम्पत्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

एसटी प्रवासी संख्येत घट

एसटीच्या प्रवासामध्ये करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, प्रवाशांच्या बैठक व्यवस्थेमध्ये बदल करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने नुकताच घेतला होता. त्यानुसार दोन आसन क्षमतेच्या बैठक व्यवस्थेवर केवळ एकच प्रवासी बसवण्यात येत आहे. त्यामुळे बर्‍याच प्रवाशांनी एसटीतून प्रवास कमी केला आहे. करोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात एसटीच्या प्रवासी संख्या कमी झाली आहे. ११ मार्च ते १७ मार्चपर्यंत एसटीच्या राज्यभरात ३४ हजार २४१ फेर्‍या रद्द करण्याची वेळ महामंडळावर आली आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. गर्दीच्या वेळी प्रवाशांच्या मधील संभाव्य संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने, त्यांच्या बस मधील बैठक व्यवस्था झिकझॅक पध्दती करण्यात येत आहे. त्यामुळे सुध्दा प्रवासी संख्येत कमालीची घट झाली आहे. मात्र आता नवरा बायको, जोडीदार आणि कुटुंबिय असणार तर एकत्र प्रवास करण्याची मुभा एसटीकडून देण्यात आली आहे. जर एकच प्रवासी असेल तर त्यानुसार बसेसच्या प्रत्येक दोन आसन क्षमतेच्या बैठक व्यवस्थेवर केवळ एकच प्रवासी बसवण्यात येत आहे. याप्रमाणे संपूर्ण बसमध्ये बस क्षमतेच्या केवळ ५० टक्केच प्रवासी बसवून, ती बस मार्गस्थ करण्यात येत आहे. कोणत्याही बस मध्ये गर्दी टाळण्यासाठी उभे राहून प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत नाही आहे. मात्र जेव्हापासून हा निर्णय घेतला तेव्हापासून प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

जोडीदारांना आणि कुटुबियांना मुभा

एसटी महामंडळाचे जाळे राज्यभरात आहेत. दररोज एसटीतून ग्रामीण भागातील नागरिक प्रवास करतात. ज्यामध्ये विद्यार्थी, कामगार, पासधारक, निवृत्त कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक समावेश आहे. इतकेच नव्हेतर सर्वाधिक प्रमाण कुटुंबिय प्रवासाचे सुध्दा आहे. जर लहान मुलांना एसटीतून प्रवास करत असेल तर तो खिडकीचा बाहेर हात काढू शकतो. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण सुध्दा असते. परिणामी यासर्वांची गांर्भीय बाबी लक्षात घेता एसटी महामंडळानी कुटुंबियांवर प्रवास करण्यार्‍या आसणात मुभा देण्यात आली आहे. तसेच पति-पत्नी, जोडीदार यांना एका सीटवर बसता येणार आहे. अशी माहिती एसटी महामंडळातील एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे.

राज्यभरात ५० हजार फेर्‍या रद्द

ग्रामीण भागातील करोनामुळे स्थानिकांनी, शेतकर्‍यांनी प्रवास कमी करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये विद्यार्थी, कामगार, पासधारक, निवृत्त कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक म्हणून सवलती देण्यात आलेल्या सर्वांनी घरी बसणे पसंत करत असल्यामुळे एसटीची प्रवासी संख्या कमी झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत ११ मार्च ते १८ मार्चपर्यंत एसटीच्या राज्यभरात ५० हजार फेर्‍या रद्द झाल्यांची माहिती मिळत आहे.


हेही वाचा – कंत्राटी कामगारांनी ‘काम बंद’ केल्यास भीषण परिणाम!


 

First Published on: March 20, 2020 8:07 PM
Exit mobile version