घरताज्या घडामोडीकंत्राटी कामगारांनी 'काम बंद' केल्यास भीषण परिणाम!

कंत्राटी कामगारांनी ‘काम बंद’ केल्यास भीषण परिणाम!

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर घनकचरा कंत्राटी कामगारांना सर्वोच्च प्राधान्याने सुविधा पुरवा मनसेची पालिका आयुक्तांकडे आग्रही मागणी

करोना विषाणूशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या भितीपोटी उद्या जर मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागातील कंत्राटी कामगारांनी ‘काम बंद आंदोलन’ पुकारले किंवा त्यांपैकी काहीजणांनी कामावर येण्यास टाळाटाळ केली तर त्यांचे भीषण परिणाम कोट्यवधी मुंबईकरांना भोगावे लागतील. तसे घडू नये म्हणून घनकचरा व्यवस्थापन विभागातील सर्वच्या सर्व कंत्राटी कामगारांना सर्वोच्च प्राधान्याने उत्कृष्ट गुणवत्तेचे मास्क, हातमोजे, गमबूट तसेच हँड सॅनिटायझर आणि इतर आवश्यक त्या वस्तू-सुविधा तत्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी तसंच कंत्राटदार यांना आदेश द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे केली आहे.


हेही वाचा – भारताचे दिग्गज फुटबॉलपटू पी. के. बॅनर्जी काळाच्या पडद्याआड

- Advertisement -

गेल्या काही दिवसांत मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे सर्व खासगी कार्यालये तसेच सरकारी कार्यालये बंद ठेवण्याच्या किंवा ५० टक्के कर्मचा-यांनाच कामावर बोलावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, कर्मचा-यांचा एक वर्ग असाही आहे, ज्यांनी कामावर न येणे हे कुणालाही परवडणारे नाही. तो वर्ग आहे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांचा, असे सांगत केतन नाईक पुढे म्हणाले, “मुंबईच्या गल्ल्यागल्ल्यांतून कचरा जमा करणारे स्वच्छक कामगार, रस्ते सफाई करणारे कामगार, कचरा गाड्या भरणारे कामगार आणि कचरा गाड्या चालवणारे चालक यांच्यामुळेच आपली मुंबई स्वच्छ आणि रोगराईमुक्त राहते.” दुर्दैवाने या कंत्राटी कामगारांना पुरेसे वेतन तर मिळत नाहीत, पण त्यांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी योग्य त्या सुविधाही त्यांना पालिका प्रशासनाकडून आणि संबंधित कंत्राटदारांकडून उपलब्ध करून दिल्या जात नाहीत, असा आरोपही केतन नाईक यांनी महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. “आवश्यक त्या वस्तू-सुविधांच्या अभावी कंत्राटी कामगार नाराज होणार नाहीत, त्यांचे मानसिक धैर्य ढळणार नाही. त्यांच्या शारीरिक आरोग्याला कोणताही धोका पोहोचणार नाही. याविषयी पालिका प्रशासनाने सर्वतोपरी काळजी घ्यावी,” हीच आमची एकमेव अपेक्षा असल्याचेही महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी स्पष्ट केले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -