‘निर्णय घेण्यास मी खंबीर’; पंकजा मुंडे यांचे पक्ष बदलावर स्पष्टीकरण

‘निर्णय घेण्यास मी खंबीर’; पंकजा मुंडे यांचे पक्ष बदलावर स्पष्टीकरण

OBC आरक्षणाचा मुद्दा निकाली काढा, अन्यथा निवडणुका होऊ देणार नाही; पंकजा मुंडे कडाडल्या

एकनाथ खडसे यांनी नुकताच भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मात्र त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू असतानाच पंकजा मुंडे यादेखील शिवसेनेत प्रवेश करणार असून त्यांना तशी ऑफर मिळाली असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्याबाबत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज, शनिवारी अंबेजोगाई येथे झालेल्या कार्यक्रमात स्पष्टीकरण दिले आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी शिवसेनेत जाणार का? का आणखी कुठे जाणार? अशा अफवा पसरवत माझ्याबद्दलची भविष्यवाणी काहीजण विनाकारण करत आहेत. मात्र, पक्षाने मला भरपूर दिले असून निर्णय घेण्यास मी खंबीर आहे.

या ठिकाणी आमदार नमिता मुंदडा यांच्यावतीने त्यांच्या निवासस्थानी पंकजा मुंडे यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कारादरम्यान पंकजा मुंडे यांनी अफवा पसरवणाऱ्यांना खडेबोल सुनावले. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझ्याबद्दल अफवा का पसरवल्या जातात हेच कळत नाही. आताही मी शिवसेनेत जाणार की आणखी कुठे जाणार अशा अफवा पसरवतात. माझ्या भविष्याची चिंता करून नका. मी स्वत: खंबीर आहे. माझ्या पक्षाने मला भरपूर दिल आहे, तसेच गोपीनाथराव मुंडे साहेबांची शिदोरी माझ्या पाठीशी भक्कम आहे. त्यामुळे माझी चिंता सोडा, असा शब्दात पंकजा मुंडे यांना अफवा पसरवणाऱ्यांचा खरपूस समाचर घेतला.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे

कोरोना कालावधित मी मुंबईत अडकून पडले. मी जर घराबाहेर पडले असते तर, माझ्याभोवती लोकांनी गर्दी केली असती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असता. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून मी घराबाहेर पडले नाही. मात्र, काही जणांनी याचा गैरअर्थ घेऊन पंकजा मुंडे घराबाहेर पडत नाहीत अशा अफवा पसरविल्या. कोरोना काळात एकही सत्ताधारी कोविड रूग्णालयांकडे फिरकला नाही. अशा परिस्थितीत खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि अक्षय मुंदडा यांनी प्रत्येक कोविड सेंटरला भेट दिली. रूग्णांना दिलासा दिला.

हेही वाचा – 

करदात्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा! कोरोनाकाळात मोठा दिलासा!

First Published on: October 24, 2020 7:05 PM
Exit mobile version