केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणतात – मी शाळेत गणित, मराठी विषयांत टॉपर होतो…

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणतात – मी शाळेत गणित, मराठी विषयांत टॉपर होतो…

Maharashtra Politics D Ed jobless will get justice Narayan Rane s big statement regarding teacher recruitment

‘प्राथमिक शाळेत पाचवी-सहावीत असताना गणिताचा नवीन संग्रह केला होता. गणित विषयात टॉपर होतो. तर मराठीत पाचही डिव्हिजनमधून पहिला येत होतो, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. या संवादात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. कॉलेजमधील युवकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आपण कसे घडलो याबाबतही त्यांनी माहिती दिली.

कासार्डे हायस्कुल येथे विद्यार्थ्यांच्या संवाद कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमात नारायण राणे यांनी स्वतःच्या यशाबाबत माहिती दिली. (I Was Topper Of Maths And Marathi Subject In School Says Bjp Union Minister Narayan Rane)

काय म्हणतात नारायण राणे?

“प्राथमिक शाळेत पाचवी-सहावीत असताना गणिताबाबत मी नवीन संग्रह केला होता. मी गणित विषयात टॉपर होतो. मराठीत पाचही डिव्हिजनमधून पहिला येत होतो. तसेच, गणिताच्या शिक्षिका घरी बोलवायच्या आणि माझ्याकडून गणिताचा नवीन संग्रह जाणून घ्यायच्या. त्यानंतर तो धडा विद्यार्थ्यांना शिकवत होत्या. कारण तो धडा शिकविण्यापूर्वीच मी दोन पावले सर्वांपुढे असायचो. शाळेत फारसे मित्र नव्हते, मात्र होते ते उपयोगी पडणारे होते. बुद्धिमत्ता, वैचारिक ताकद आणि नशिबामुळे मी मोठा झालो. या सर्वांमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनीच मला घडवले आहे. त्यांनीच मला परिपक्व बनवले. म्हणून उद्योग-व्यवसायात आणि राजकारणात मी यशस्वी ठरलो. माझ्या यशाचे सर्व श्रेय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना जाते” असे नारायण राणे यांनी सांगितले.

“माझ्या यशात खडतर प्रयत्न आहेतच मात्र त्याचबरोबर चांगले तेच मी स्वीकारत गेलो. चांगले मित्र, माणसं जोडत गेलो. आणि निर्व्यसनीपणा हा माझ्या यशाचे सातत्य टिकवण्यास उपयोगी ठरला. मी माझ्यातील विद्यार्थी कधीही मरू दिलेला नाही. चांगल्या गोष्टी, चांगले शब्द, चांगली वाक्य आणि चांगली माणसं मी नेहमीच संग्रही करत राहिलो. त्यांच्याकडून शिकत राहिलो”

“मी आजही विद्यार्थीच आहे. मी प्रत्येकाकडून चांगल्या गोष्टी शिकत असतो. आपण नेहमी अभ्यासाचा वेळ आणि वाचनाचा वेळ कायम राखून ठेवावा. दर दिवशी अभ्यास आणि दर दिवशी वाचन वेगवेगळ्या विषयांवर झालेच पाहिजे. यशस्वी होण्यासाठी या मेहनतीला आणि परिश्रमांना दुसरा पर्याय नाही ते तुम्हाला करावेच लागणार”, असेही नारायण राणे यांनी सांगितले.

याशिवाय, “शाळा शिकत असताना वृत्तपत्राची पेपर टाकण्याची लाईन मी चालवत होतो. बिल्डिंगमध्ये जाऊन घरोघरी पेपर टाकत होतो. त्यावेळी पंधरा रुपये महिना पगार मला दिला जात होता. पेपर टाकून येणाऱ्या पैशातून मी शाळेत लागणारे खर्च भागवत होतो”, असेही नारायण राणे यांनी म्हटले.


हेही वाचा – ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनविषयी राज्य सरकार सकारात्मक; मुख्यमंत्री शिंदेंची माहिती

First Published on: January 22, 2023 4:27 PM
Exit mobile version