छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगेन; पेडणेकरांनी आरोप फेटाळले, ED चौकशीसाठी दाखल

छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगेन; पेडणेकरांनी आरोप फेटाळले, ED चौकशीसाठी दाखल

छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगेन मी काहीही केलेलं नाही, असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी आरोप फेटाळले आहेत.

मुंबई: कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची आज ईडी चौकशी आहे. त्यासाठी त्या ईडी कार्यालयात थोड्याच वेळात दाखल होणार आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. (I will swear by Chhatrapati Shivaji Maharaj Kishori Pednekar denies allegations ED filed for investigation)

पेडणेकर म्हणाल्या आज मी ईडी कार्यालयात जात आहे. आज हजर राहण्याचं समन्स आहे. हा चौकशीचा भाग आहे. त्यांना सहकार्य करणं आपलं काम आहे. मुंबईकरांसाठी आम्ही चांगलं काम केलं आहे. हिशोब सर्वांना द्यावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगेन मी काहीही केलेलं नाही, असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी आरोप फेटाळले आहेत. चौकशी यंत्रणात राजकारण घुसलं आहे, असं म्हणत तपास यंत्रणांच्या तपास प्रक्रियेवर पेडणेकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

कोवीड बॉडी बॅग घोटाळा प्रकरण आहे तरी काय?

डेड बॉडी किट बॅग हे अवाजवी दरात विकत घेतलं, असा आरोप ठेवण्यात आला आहे. 1 हजार 300 रुपये किंमत असणारी बॉडीबॅग 6800 रुपयाला विकत घेण्यात आल्याचा आरोप आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू, परचेस डिपार्टमेंटचे उपायुक्त रमाकांत बिरादर आणि वेदांत इन्फो लिमिटेड यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची आज चौकशी होत आहे.

शितल म्हात्रेंची पेडणेकरांवर टीका

शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केली आहे. कचोरी ताई दिवाळीच्या चकल्या यंदा जेलमध्येच खाणार वाटतं. दिवा पण फडफडून विझणार वाटत! अशा शब्दात म्हात्रे यांनी पेडणेकरांवर टीका केली आहे.

शीतल म्हात्रे यांच्या या टीकेला पेडणेकर यांनी उत्तर दिलं आहे. भान हरपलेली बाई आहे ती.. सत्य काय आहे हे बघावं, असं पेडणेकर म्हणाल्या. शितल जेलमध्ये चकली बनवायची वेळ आली तर पक्ष निष्ठेची चकली बनवेल पण त्याच्यासाठी लागणारा दांडा कुठे आहे. मेलेल्या सासऱ्याच्या टाळूवरचे लोणी खाऊन खोटी सही घेऊन बसली आहेस त्याचं काय? असं ट्वीटही किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.

(हेही वाचा: “बेकायदेशीर सरकारवर बुलडोजर फिरवण्याची आवश्यकता…”, मुंब्य्रातील घटनेने संजय राऊत संतापले )

First Published on: November 8, 2023 11:53 AM
Exit mobile version